-
भारतातील 13 राज्ये आणि प्रदेशातील खेळाडू पदक विजेते ठरले. ऑलिम्पिकप्रमाणेच हरियाणाने पॅरालिम्पिकमध्येही बाजी मारली.
-
कर्नाटकचा बॅडमिंटनपटू सुहास यथीराज, बिहारचा ॲथलीट शरद कुमार, नागालँडचा होकातो सेमा आणि तेलंगणाचा दीप्ती जीवनजी हे देखील आपापल्या राज्यांचे एकमेव पदक विजेते होते ठरले.
-
सात खेळाडू असे आहेत जे त्यांच्या राज्यातून एकमेव पदक विजेते होते. महाराष्ट्राचा सचिन खिलारी, हिमाचल प्रदेशचा निषाद कुमार, दिल्लीचा प्रवीण कुमार या खेळाडूंचा पदके विजेत्यांमध्ये समावेश होता.
-
मध्य प्रदेशातील दोन खेळाडूही पदक जिंकून देशात परतले आहेत. नेमबाज रुबिना फ्रान्सिसने SH1 पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले. कपिल परमारने ज्युडोमध्ये देशाला पहिले पॅरालिम्पिक पदक मिळवून दिले.
-
जम्मू-काश्मीरचे खेळाडूही पदकविजेते ठरले. पॅरा तिरंदाज सिमरन शर्मा आणि राकेश शर्मा यांनी देशासाठी कांस्यपदक जिंकले. मिश्र सांघिक कंपाऊंडमध्ये राकेशसह शीतल देवीने कांस्यपदक पटकावले. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या एकेरीत पदक जिंकता आले नाही.
-
उत्तर प्रदेशातील तीन खेळाडू पदक जिंकून देशात परतले. मेरठच्या प्रीती पालने T35 स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. सिमरन शर्माने T12 200 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. भालाफेकपटू अजित सिंगने रौप्यपदक जिंकले.
-
राजस्थानच्या तीन खेळाडूंनीही पदके जिंकली. नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी याच स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. तर सुंदरसिंग गुर्जरने भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले.
-
तामिळनाडूचे चार खेळाडू पदकविजेते म्हणून परतले. यामध्ये बॅडमिंटनपटू निथ्या श्री, मनीषा रामदास, तुलसिमती मुरुगेसन आणि ॲथलीट मरियप्पन थांगावेलू यांच्या नावांचा समावेश आहे.
-
हरियाणाच्या 8 खेळाडूंनी पदके जिंकली. सुमित अंतिल, धर्मबीर नयन, नवदीप, योगेश कथुनिया, प्रणव सुरमा, नेमबाज मनीष नरवाल, बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि तिरंदाज हरविंदर सिंग यांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”