-
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना जागेसाठीची लढत चुरशीची झाली आहे. काँग्रेसने ऑलिम्पियन विनेश फोगटला तिकीट दिले आहे. विनेशच्या विरोधात आम आदमी पक्षाने एका माजी पैलवानाला मैदानात उतरवले आहे. आम आदमी पक्षाने भारताची सुवर्णपदक विजेती आणि माजी कुस्तीपटू कविता दलालला तिकीट दिले आहे. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
कविता ही जुलाना येथील रहिवासी आहे. तिचा जन्म जुलाना येथील माळवी गावात झाला. २००९ मध्ये तिचे लग्न झाले आणि पुढच्याच वर्षी ती आई झाली. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
कविता दलालचा खेळाशी सखोल संबंध आहे. कविताने वेटलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१६ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
२०१६ मध्येच ती द ग्रेट खलीच्या अकादमीमध्ये गेली होती. यानंतर तिने व्यावसायिक कुस्तीमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये तिने WWE सोबत करार केला होता. त्यानंतर तिने रेसलमेनिया ३४ मध्ये पदार्पण केले. तिने अनेक लढतीत भाग घेतला पण काही विशेष करू शकली नाही. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
कविता दलाल सूट घालून रिंगमध्ये शिरायची. तिचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली. २०१९ मध्ये त्यांनी भारतातील WWE सुपर लीगसाठी कुस्तीपटू निवडण्यास सुरुवात केली होती तर WWE ने तिला २०२१ मध्ये कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त केले. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
चार वर्षे अमेरिकेत घालवल्यानंतर कविता दलालने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये भारतात आल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला. कविताने दोन वर्षांपूर्वी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
मागील वर्षी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतरवर धरणे धरले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कविता दलालनेही जंतरमंतर हजेरी लावली होती. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
जंतरमंतर येथे कविताने सांगितले होते की, माजी आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या छळामुळे तिलाही खेळ सोडावा लागला होता. तिने सांगितले की, हे सत्य सांगण्याचे धाडस मी आधी करू शकले नाही, पण विनेश फोगटला पाहिल्यानंतर तिला हिंमत मिळाल्याचे तिने सांगितले होते. (Photo- Kavita Dalal/Facebook)
-
विनेशला पाहून कविताला हिंमत मिळाली होती पण आता ती विनेशच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. एका बाजूला जिंदची मुलगी कविता असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जिंदची सून विनेश फोगट. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचा पती सोमवीर राठी हा जिंदचा रहिवासी आहे. (Photo- Kavita Dalal/Facebook)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”