-
बेलारूसचा बॉडीबिल्डर इल्या ‘गोलेम’ येफिमचिकचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. इल्या ‘गोलेम’ येफिमचिक यांना 6 सप्टेंबर 2024 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तो कोमात गेला. 11 सप्टेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली. जगातील ‘मोस्ट पॉवरफुल बॉडीबिल्डर’ म्हणून ओळखला जाणारा येफिमचिक त्याच्या प्रचंड आकारमानासाठी आणि विलक्षण ताकदीसाठी प्रसिद्ध होता. इल्या ‘गोलेम’ येफिमचिक यांना ‘द म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते.
-
इल्या येफिमचिक 6 फूट 1 इंच उंच होता. त्याचे वजन 340 पौंड (सुमारे 154.221 किलो) होते. इल्या येफिमचिकच्या दैनंदिन आहारात सुशीचे 108 तुकडे आणि 2.5 किलोग्रॅम स्टेक समाविष्ट होते. यामुळे त्याच्या शरीराला दररोज 16,500 कॅलरीज मिळत होत्या. तो दररोज 600 पौंड बेंच प्रेस आणि 700 पौंड डेडलिफ्ट करायचा. येफिमचिकने कधीही व्यावसायिक बॉडीबिल्डर स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. असे असूनही त्याने खूप प्रसिद्धी मिळवली होती. इन्स्टाग्रामवर त्याचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
-
इल्या येफिमचिक दिवसातून 7 वेळा खात असे. त्याची छाती 61 इंच होती, तर बायसेप्स 25 इंच होती. शालेय जीवनात त्यांचे वजन फक्त 70 किलो होते. बेलारूसचा हा बॉडीबिल्डर त्यावेळी एकही पुश-अप करू शकला नव्हता. तथापि, कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि व्यायामाचे मानसशास्त्र आणि पोषण यांचे योग्य आकलन यामुळे तो स्वत:ला इतका मजबूत बनवू शकला.
-
Dailystar.co.uk च्या रिपोर्टनुसार, 6 सप्टेंबर 2024 रोजी तो घरी असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिका येईपर्यंत पत्नीने सीपीआर देण्याचा प्रयत्न करत राहिली. त्याला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोमात गेला. त्याची पत्नी अॅनाने लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
-
11 सप्टेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्याकडून इल्या येफिमचिकला बॉडीबिल्डर बनण्याची प्रेरणा मिळाली होते. त्याचे वजन 380 पौंड गाठण्याचे स्वप्न होते. बेलारूस नंतर तो अनेक देशांमध्ये राहिला. बेलारूसनंतर तो झेक प्रजासत्ताक आणि अमेरिकेतही राहिला. नंतर दुबईत राहू लागले होते.
-
अॅनाने बेलारशियन न्यूज आउटलेट ऑनलाइनरला सांगितले, ‘मी प्रार्थना केली होती. त्यामुळे तो बरा होईल अशी आशा होती. दोन दिवस त्यांची प्रकृती ठीक होती, पण डॉक्टरांनी मला ब्रेन डेड झाल्याची भयानक बातमी दिली. मी सर्वांचे त्यांच्या संवेदनाबद्दल मी आभार मानते. मी या जगात एकटी नाही हे समजून घेणे खूप हृदयस्पर्शी आहे. अनेकांनी मला मदत आणि पाठिंबा दिला आहे.
-
ब्रिटीश बॉडीबिल्डर नील करी वयाच्या 34 व्या वर्षी तर ब्राझीलचा अँटोनियो सूझा यांचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, नील करी सप्टेंबर 2023 मध्ये मृतावस्थेत आढळून आला होता, त्याच्या पालकांनी दीर्घकालीन स्टिरॉइड सेवनाचे कारण सांगितले होते. एका स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान पटकावल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सूझाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. (फोटो सौजन्य- फेसबुक/इल्या येफिमचिक)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”