-
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. (Photo-AP)
-
रोहित शर्माने 2022 साली हा विक्रम केला होता आणि त्याच वर्षी त्याने कर्णधार म्हणून T20I मध्ये 32 षटकार मारले होते. (Photo-AP)
-
कर्णधार म्हणून, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा रोव्हमन पॉवेल हा दुसरा कर्णधार आहे. पॉवेलने 2023 साली असा पराक्रम केला आणि T20I मध्ये कर्णधार म्हणून 26 षटकार मारले. (Photo-AP)
-
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी टी-20 कर्णधार ॲरॉन फिंच तिसऱ्या स्थानावर आहे. फिंचने 2018 साली कर्णधार म्हणून 25 षटकार मारले होते आणि तो कांगारू संघाचा अशी कामगिरी करणारा कर्णधार देखील आहे ज्याने T20I मध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. (Photo-AP)
-
T20I मध्ये कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा दासुन शनाका चौथ्या स्थानावर आहे. दासुन शनाकाने 2022 साली आपल्या संघासाठी T20I मध्ये कर्णधार म्हणून 24 षटकार मारले होते. (Photo-AP)
-
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सध्याचा टी-२० कर्णधार मिचेल मार्श सध्या या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 2024 मध्ये T20I मध्ये कर्णधार म्हणून 23 षटकार मारले आहेत आणि T20I मध्ये कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्याकडे आहे. (Photo-AP)
-
या यादीत भारताचा माजी T20I कर्णधार रोहित शर्मा पुन्हा सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याने 2024 साली T20I मध्ये एकूण 23 षटकार ठोकले होते. रोहित शर्माने 2024 चा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर T20I मधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo-AP)
-
T20I मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली 7 व्या क्रमांकावर आहे. कोहलीने 2019 मध्ये कर्णधार म्हणून T20I मध्ये एकूण 23 षटकार मारले होते. (Photo-AP)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”