-
भारत आणि पाकिस्तानमधील अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांचा घटस्फोट झाला आहे. यातील बहुतांश क्रिकेटपटूंनी दुसरे लग्न केले आहे. यापैकी दोन भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी संबंधित आहेत.
-
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले. दोघांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा असून तो सानियासोबत राहतो. शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. (Photo : Sania Mirza Instagram)
-
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा आयशापासून दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. दोघांनी 2012 साली लग्न केले. काही काळापूर्वी शिखर धवनने ‘क्रूरते’च्या कारणावरून गुन्हा दाखल केला होता. (Photo – Shikhar Dhawan Instagram)
-
माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक सध्या स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलचा पती आहे. याआधी त्याने त्याची बालपणीची मैत्रिण निकितासोबत लग्न केले होते आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. निकिता सध्या मुरली विजयची पत्नी आहे (Photo- ANI)
-
भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीनने दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोट घेतला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन अभिनेत्री संगीता बिजलानीशी दुसरे लग्न केले. मात्र हे लग्नही टिकले नाही. सानिया मिर्झाची बहीण अनम ही अझरुद्दीनची सून आहे. (Photo- ANI)
-
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचाही घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर युवराज सिंगने आई शबनम सिंगसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. योगराज यांनी सतबीर कौर यांच्याशी दुसरे लग्न केले. (Photo- Indian Express)
-
भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू विनोद कांबळीने त्याची बालपणीची मैत्रिण नोएला लुईस हिच्याशी 1998 साली लग्न केले. 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कांबळीने मॉडेल अँड्रिया हेविटसोबत दुसरे लग्न केले. (Photo- ANI)
-
रवी शास्त्री यांचाही घटस्फोट झाला आहे. वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू शास्त्री यांनी बालपणीची मैत्रीण रितू सिंगशी लग्न केले. त्यांचे लग्न 22 वर्षे चालले. 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. शास्त्रींनी दुसरे लग्न केले नाही. (Photo- ANI)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”