-
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची यादी समोर आली आहे. या यादीत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताचे आहेत. जाणून घेऊया जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहेत.
-
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे अहमदाबाद, गुजरात येथे आहे. या स्टेडियममध्ये १ लाख ३२ हजार लोक बसू शकतात. यामध्ये ४ ड्रेसिंग रूम, ११ खेळपट्ट्या आणि २ सराव मैदान आहेत.
-
जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे जेथे १००,०२४ प्रेक्षक बसू शकतात.
-
पश्चिम बंगालचे ईडन गार्डन स्टेडियम जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. जिथे ६८,००० प्रेक्षक बसू शकतात.
-
भारतातील आणखी एक स्टेडियम जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची ६५,००० आसनक्षमता आहे.
-
ऑस्ट्रेलियाचे पर्थ स्टेडियम पाचव्या स्थानावर आहे जेथे ६१,२६६ प्रेक्षक बसू शकतात.
-
जगातील सहावे सर्वात मोठे स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ॲडलेड ओव्हल स्टेडियममध्ये ५३,५८३ प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
-
भारताचे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे जगातील ७ वे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. केरळमधील या स्टेडियममध्ये ५०,००० प्रेक्षक बसू शकतात.
-
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच्या यादीतील आठव्या क्रमांकावर लखनौचे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम आहे ज्याची आसनक्षमता ५०,००० आहे.
-
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमची आसनक्षमता ५०,००० आहे.
-
जगातील १० वे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियाचे डॉकलँड्स आहे. क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळांच्या स्पर्धाही यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्टेडियमची आसन क्षमता ४८,००३ प्रेक्षक आहे.
-
(हे ही पाहा: Photos: पती अष्टपैलू खेळाडू तर पत्नी अभियंता, वाचा भारतीय संघाच्या शतकवीर खेळाडूची अनोखी प्रेम कहाणी)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”