-
टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वेस्ट इंडिजचा फलंदाज किरॉन पोलार्डच्या नावावर नोंदवला गेला आहे. पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 170 डावांमध्ये 284 षटकार मारले असून तो टी-20चा नवा सिक्सर किंग बनला आहे. (एपी फोटो)
-
या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून धोनीने T20 क्रिकेटमध्ये 281 डावांमध्ये एकूण 276 षटकार मारले होते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र तो आयपीएल खेळत आहे. (एपी फोटो)
-
या यादीत भारतीय टी-20 संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने T20 क्रिकेटमध्ये 224 डावांमध्ये 273 षटकार ठोकले आहेत. (एपी फोटो)
-
टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चॅम्पियन बनवल्यानंतर रोहितने T20I मधून निवृत्ती घेतली. (एपी फोटो)
-
फाफ डुप्लेसीची देखील T20 च्या महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते आणि T20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. डुप्लेसिसने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 175 डावांमध्ये 233 षटकार मारले आहेत. (एपी फोटो)
-
या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. T20I मधून निवृत्त झालेल्या या माजी भारतीय कर्णधाराने T20 क्रिकेटमधील 188 डावात एकूण 227 षटकार ठोकले होते. (एपी फोटो)
-
ॲरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो इतर टी-२० लीगमध्ये खेळताना दिसत आहे. फिंचचीही जगातील आक्रमक फलंदाजांमध्ये गणना होते. T20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर असून त्याने 168 डावात 187 षटकार ठोकले आहेत. (एपी फोटो)
-
या यादीत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल 7 व्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 95 डावांमध्ये 182 षटकार ठोकले होते. मात्र, एकूणच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (एपी फोटो)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”