सध्या भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवला गेला आहे.या सामन्यामध्ये अश्विनच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाची विजय आणखी भक्कम झाली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी प्रसिद्ध आहेच पण अनेकांना त्याच्या प्रेमकहाणी आणि त्याच्या पत्नीबद्दल जास्त माहिती नाही आहे. रविचंद्रन अश्विनच्या वैयक्तिक जीवनाबाबत बोलायचे झाले तर, त्याची पत्नी पृथ्वी नारायणनही एक अभियंता आहे. अश्विन आणि पृथ्वी हे शाळेतील मित्र होते, दोघे लहानपणापासून एकमिकांना ओळखत होते. कॉलेजच्या दिवसात अश्विनने पृथ्वीला क्रिकेट ग्राउंडवर प्रपोज केले आणि पुढे बालपणीच्या मैत्रीचे आयुष्यभराच्या भागीदारीत रूपांतर झाले.२०११ च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी, अश्विन आणि पृथ्वीचा साखरपुडा पार पडला होता. अश्विनने भारताच्या विश्वचषक विजयात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. अश्विन आणि पृथ्वी यांना आध्या आणि अकीरा नावाच्या दोन लहान मुली आहेत. अनेकदा पृथ्वी स्टेडियमला मॅच बघायलाही येते. (सर्व फोटो: रविचंद्रन अश्विन/इन्स्टाग्राम)