-
भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ भलेही टीम इंडियातून बाहेर असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
-
मीडिया रिपोर्ट्सच्या मते पृथ्वी शॉ हा निधी तपाडिया हिला डेट करत आहे. पण तिचे युजवेंद्र चहलशी घट्ट नाते आहे.
-
पृथ्वीचे नाव अभिनेत्री निधी तापडियाबरोबर बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. दोघे अवॉर्ड शोमध्येही एकत्र दिसले होते. इतकेच नव्हे तर हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्टही करतात.
-
फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल निधीला आपली बहीण मानतो. निधीच्या वाढदिवशी चहलने निधीसाठी खास पोस्ट केली होती.
-
चहलने निधीबरोबरचा फोटो शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कॅप्शनमध्ये त्याने निधीला बहिणसुद्धा म्हटले आहे. निधीनेही भाऊ असा उल्लेख करत चहलचे आभार मानले.
-
चहलशिवाय पृथ्वी शॉनेही निधीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. रोमॅटिक फोटो पोस्ट करतॉ
त्याने निधीला कायम सोबत दिल्याबद्दल तिचे आभार मानले आहेत. निधीने शॉला टेडी म्हणत त्याचे आभार मानले. -
नाशिकची राहणारी निधी तापडिया ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. निधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य- निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”