-
भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर चेन्नई कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर त्याने मोहम्मद रिझवान आणि लिटन दासचे विक्रम मोडीत काढले. (एपी फोटो)
-
ऋषभ पंतचे हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील चौथे शतक होते आणि तो आता डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक बनला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी यष्टिरक्षक रिझवान आणि लिटन दास यांच्या नावावर होता. (एपी फोटो)
-
मोहम्मद रिझवानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यष्टीरक्षक म्हणून आतापर्यंत ३ शतके झळकावली होती.आता त्याचा विक्रम ऋषभ पंतने मोडला आहे. पंतने डब्ल्यूटीसीमध्ये यष्टीरक्षक म्हणून ४ शतकं झळकावली आहेत. (एपी फोटो)
-
बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दासनेही आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ३ शतके झळकावली आहेत. तो रिझवानसह पहिल्या क्रमांकावर होता. पण पंतने या दोघांनाही मागे टाकले. आता रिझवान आणि लिटन दास संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. (एपी फोटो)
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे. डी कॉकने डब्ल्यूटीसीमध्ये २ शतके झळकावली होती. (एपी फोटो)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”