-
24 सप्टेंबर ही तारीख क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि यष्टीरक्षक फलंदाजी ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतसाठी खूप खास आहे. दोघांचा या तारखेशी असलेला संबंध हा खास सेलिब्रशनचे एक कारण आहे.
-
अर्जुन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आणि रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळतो. (फोटो सौजन्य- ऋषभ पंत इन्स्टाग्राम)
-
ऋषभ पंतची बहीण साक्षी लंडनमध्ये राहते. ती ऋषभ पंतपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या भावाचा सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमध्ये आलेली दिसते. (फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)
-
अर्जुन आणि साक्षी या दोघांचाही वाढदिवस 24 सप्टेंबरला असतो. यावर्षी अर्जुन तेंडुलकर 25 वर्षांचा झाला आहे, तर पंतची बहीण साक्षी 29 वर्षांची झाली आहे. (फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)
-
अर्जुन तेंडुलकरला अनेक क्रिकेटपटूंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या पण सर्वात खास शुभेच्छा त्याला बहीण साराकडून मिळाल्या. साराने लहानपणीचे फोटो शेअर करून अर्जुनचे शुभेच्छा दिल्या. (छायाचित्र सौजन्य- अर्जुन तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्या घरच्या बाळाला आणि आमच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या अर्जुनला 25 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.(छायाचित्र सौजन्य- अर्जुन तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
साक्षी पंतलाही तिच्या मित्रांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या, ज्याची तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. साक्षी तिच्या पतीसोबत हा खास दिवस साजरा करत आहे.(फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…