विश्वनाथचे वर्चस्व, अझहरचे सलग तिसरे शतक, मार्शलचा कहर आणि आफ्रिदीच्या स्फोटक खेळीसाठी ओळखले जाते ग्रीनपार्क
IND vs BAN Test Series Updatees : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे होणार आहे. भारताने 1983 पासून येथे एकही कसोटी गमावलेली नाही. या
माजी भारतीय क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथने ग्रीनपार्क, कानपूर येथे कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने सात कसोटी सामन्यांमध्ये 86.22 च्या उत्कृष्ट सरासरीने 776 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. (फोटो – आयसीसी)ग्रीन पार्कमध्येच 21 वर्षीय युवा मोहम्मद अझरुद्दीनने 1984-85 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केल्यानंतर सलग तिसरे शतक झळकावले होते. हैदराबादच्या या स्टायलिश फलंदाजाने पहिल्या डावात 122 धावांची शानदार खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या डावात त्याने 54 धावा केल्या. कसोटी सामना अनिर्णित असला तरी अझरुद्दीनने आपली छाप सोडण्याता यशस्वी झाला होता. मोहम्मद अझरुद्दीनने कारकिर्दीतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 439 धावा केल्या. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)22 ऑक्टोबर 1983 रोजी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शलने जागतिक मंचावर आपली छाप पाडली होती. मार्शलने 8 षटकांत 5 मेडन्स टाकून 9 धावांत 4 विकेट्स घेत भारताचा धूळ चारली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने भारताचे आघाडीचे फलंदाज सुनील गावस्कर (0), अंशुमन गायकवाड (4), मोहिंदर अमरनाथ (0), दिलीप वेंगसरकर (14) यांना बाद केले होते. (फोटो – संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)तत्पूर्वी, मार्शलने 92 धावांची खेळी खेळली आणि गॉर्डन ग्रीनिज (194) सोबत सातव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. मार्शलने दुसऱ्या डावातही भारताची आघाडीची फळी उद्ध्वस्त केली होती. सुनील गावसकर (7), अंशुमन गायकवाड (5), रॉजर बिन्नी (7) दिलीप वेंगसरकर (65) बाद झाले. वेस्ट इंडिजने हा सामना एक डाव आणि 83 धावांनी जिंकला होता. (फोटो- आयसीसी)1994 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या विल्स वर्ल्ड सीरिजमध्ये मनोज प्रभाकर आणि नयन मोंगिया या जोडीने जबरदस्त फलंदाजी केली होती. शेवटच्या नऊ षटकांत भारताला विजयासाठी 63 धावा हव्या होत्या आणि पाच विकेट्स होत्या. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 बाद 257 धावा केल्या. मनोज प्रभाकरने शतक झळकावले. (फोटो – संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)41व्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या 195/5 होती. संघ सामना जिंकेल असे वाटत होते. प्रभाकरला साथ देण्यासाठी नयन मोंगिया क्रीजवर आला. या जोडीने पुढील चार षटकांत पाच धावा आणि शेवटच्या पाच षटकांत ११ धावा जोडल्या. भारताने 211/5 धावा केल्या. वेस्ट इंडिजने हा सामना 46 धावांनी जिंकला. प्रभाकर 152 चेंडूत 102 धावा करून नाबाद राहिला, तर मोंगियाने 21 चेंडूत चार धावा केल्या. (फोटो – संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)याच मैदानावर शाहिद आफ्रिदीने 45 चेंडूत शानदार शतक झळकावल्यामुळे पाकिस्तानने कानपूरमध्ये भारताचा पाच विकेट्सने पराभव केला होता. या स्फोटक सलामीवीर फलंदाजाने 46 चेंडूत 10 चौकार आणि 9 षटकारांसह 102 धावा केल्या आणि पाकिस्तानने भारताचे 249/6 धावांचे लक्ष्य 42.1 षटकात पूर्ण केले. राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ (78) यांनी राणा नावेद-उल-हसनने दिलेल्या सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला होता. (फोटो – संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 6 बाद 249 धावा केल्या होत्या. नावेदने आपल्या पहिल्या तीन षटकांत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दमदार सलामीच्या जोडीला बाद केले. महेंद्रसिंग धोनी चौथ्या षटकात बाद झाल्याने भारताची धावसंख्या 3 विकेटवर 26 अशी झाली. द्रविड आणि कैफ यांनी पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. गांगुलीच्या जागी आलेल्या मोंगियाने 28 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. (फोटो – संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)