-
बाबर आझम पाकिस्तान क्रिकेटचा सुपरस्टार आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे, जगभरातील चाहते केवळ त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीचे कौतुक करत नाहीत तर त्याच्या संपत्ती आणि जीवनशैलीसह त्याच्या मैदानाबाहेरील यशाबद्दल जाणून घेण्यास देखील उत्सुक असतात.
-
बाबर आझमची एकूण संपत्ती अंदाजे ५ दशलक्ष डॉलर (४१ कोटी) आहे, जी त्याच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीचा आणि वाढत्या ब्रँड मूल्याचा दाखला आहे. हा आकडा त्याचे क्रिकेट आणि जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न दाखवतो.
-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ‘A’ ग्रेड करार असलेल्या तीन खेळाडूंपैकी एक म्हणून बाबर आझम पाकिस्तानी रुपयांमध्ये ३ दशलक्ष महिन्याला कमावतो, ही कमाई त्याच्या मागील कमाईच्या तुलनेत २०२ टक्क्यांनी अधिक आहे.
-
बाबरच्या पीएसएल मानधनातही लक्षणीय वाढ झाली आहे, सिल्व्हर श्रेणीतील बाबरला आधी २५,००० डॉलर मिळायचे ते आता प्लॅटिनम श्रेणीमध्ये १,३०,००० पर्यंत वाढले आहे. ही वाढ लीगमधील त्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.
-
बाबरने ओप्पो, हेड अँड शोल्डर्स, एचबीएल आणि हुआवे सारख्या top ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या निव्वळ संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
-
बाबरला प्रति कसोटी १.२५ दशलक्ष पाकिस्तानी रुपये, एकदिवसीय खेळासाठी ६६४,६२० रुपये, ४१८,५८४ T20 साठी PCB कडून वार्षिक मानधन मिळते.
-
याशिवाय बाबर २ दशलक्ष डॉलरची देणगीही करतो, ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर शिकत असलेल्या २५० गरजू विद्यार्थ्यांना तो मदत करतो. यातून त्याची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
-
यामाहा R१ सुपरबाइक आणि ऑडी A५ सह बाबरकडे आलिशान वाहनांचा संग्रह आहे, त्याला गाड्यांची आवड आहे.
-
दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे बाबर आझमला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ