-
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यात न्यूजीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी मात करत प्रथमच जेतेपद पटकावले. (Photo Source : ICC)
-
त्याचबरोबर क्रिकेट जगताला टी-२० विश्वचषकाचा नवा विजेता मिळाला आहे. (Photo Source : ProteasWomenCSA)
-
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेतेपदाचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. (Photo Source : ICC)
-
दरम्यान ही संपूर्ण टूर्नामेंट लो-स्कोअरिंगमुळेही जास्त चर्चेत राहीली असली तरीही काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. (Photo Source : ICC)
-
आघाडीच्या धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये एका भारतीय फलंदाजाचेही नाव आहे. या स्पर्धेतील मोठी धावसंख्या करणाऱ्या पाच खेळाडूंवर एक नजर टाकुया.(Photo Source : ICC/X)
-
लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड २०२४ च्या विश्वचषकामधील सहा सामन्यांत४४.६० च्या सरासरीने २२३ धावा करत आघाडीवर राहिली, यामध्ये तिने एक अर्धशतक केले आहे. (Photo Source : ICC) -
तझमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)
वोल्वार्डची जोडीदार तझमिन ब्रिट्सने सहा सामन्यांत ३७.४० च्या सरासरीने १८७ धावा करून स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. (Photo Source: Proteas Women/X) -
डॅनियल व्याट-हॉज (इंग्लंड)
इंग्लंडची सलामीवीर डॅनियल व्याट-हॉजने तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. तिने चार सामन्यांत ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा केल्या. (Photo Source: England Cricket/Instagram) -
हरमनप्रीत कौर (भारत)
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने चार सामन्यांमध्ये १५० धावा केल्या,५४ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Source : ICC) -
सुझी बेट्स (न्यूझीलंड)
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्स ही भारताची कर्णधार हरमनप्रीतच्या बरोबरीने होती. तिने सहा सामन्यांत २५.०० च्या सरासरीने १५० धावा केल्या आहेत. (Photo Source : ICC)
हेही पाहा – अजित पवारांनी यादीऐवजी वाटले थेट एबी फॉर्म, ‘हे’ १७ उमेदवार ठरले नशीबवान!…

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…