-
आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी नोव्हेंबरमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. याआधी, सर्व १० फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे. त्यामुळे आज सर्व १० फ्रँचायझी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करणार आहेत. सर्व फ्रँचायझी जास्तीत ज्सात ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. ज्यामध्ये ५ कॅप्ड खेळाडू आणि २ अनकॅप्ड भारतीय खेळाडू कायम ठेवले जाऊ शकतात.
-
दरम्यान, फ्रँचायझी आणि खेळाडूही पैशाच्या चर्चेअभावी वेगळे होत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंची नावे सांगणार आहोत ज्यांना आज रिलीज केले जाऊ शकते म्हणजेच संघांकडून सोडले जाऊ शकते आणि त्यांना होणाऱ्या नव्या लिलावात २० कोटींहून अधिक रुपये मिळू शकतात.
-
आंद्रे रसेल
माध्यमांतील माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्स स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलला सोडणार आहे. रसेल हा सध्या टी-२० चा सर्वात मोठा खेळाडू मानला जातो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याला तोड नाही. अशा स्थितीत लिलावामध्ये त्याच्यासाठी जोरदार स्पर्धा होणार हे नक्की आहे. -
मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. गेल्या वर्षी लिलावात त्याला २४ कोटींहून अधिक रुपयांना विकत घेण्यात आले होते. केकेआर त्याला सोडणार आहे. स्टार्क हा मोठ्या सामन्यांचा खेळणारा खेळाडू आहे. यामुळेच पुन्हा एकदा त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते. -
श्रेयस अय्यर
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पैशांच्या कारणामुळे वेगळा होणार आहे. अय्यरने मागितलेलं मानधन देण्यास केकेआरने नकार दिला आहे. -
अय्यरकडे आयपीएल चॅम्पियन कर्णधाराचा टॅग आहे आणि यामुळे त्याला लिलावात २० कोटी रुपये मिळू शकतात.
-
केएल राहुल
गेले काही सीझन केएल राहुलसाठी खास राहिलेले नाहीत. त्याच्या स्ट्राईक रेटवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही लखनौ सुपर जायंट्सने त्याला पहिले निवडायचे होते परंतू खुद्द राहुलने यासाठी नकार दिला. -
त्याच्याशी अनेक फ्रँचायझींनी संपर्क साधला आहे आणि लिलावात त्याला मोठी रक्कम मिळू शकते.
-
ऋषभ पंत
ऋषभ पंत २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत होता. आता फ्रँचायझीने त्याच्यासोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यष्टिरक्षक असण्यासोबतच मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज ते पंत कर्णधारपदही सांभाळू शकतो. अशा स्थितीत त्याच्यावर मोठी बोली लागणार हे निश्चित मानले जात आहे. (सर्व फोटो सोजन्य- आयपीएल)
हेही पाहा- Photos : स्पेनमध्ये भीषण पुरामुळे आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू, रस्त्यांची दुरावस्था, र…
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ