-
माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे हे भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. त्यांनी १३२ सामन्यात ६१९ बळी घेतलेले आहेत. (Photo: PTI)
-
भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने १०५ कसोटी सामन्यांमध्ये २३.९६ च्या सरासरीने ५३३ बळी घेतले आहेत.(Photo: REUTERS)
-
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये २९.४६ च्या सरासरीने ४३४ बळी घेतले. (Photo: Indian Express)
-
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: REUTERS)
-
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ७७ कसोटीत २३.९६ च्या सरासरीने ३१४ विकेट घेतल्या आहेत. (Photo: Indian Express)
-
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने १०५ कसोटी सामन्यांमध्ये ३२.४ च्या सरासरीने ३११ बळी घेतले आहेत. (Photo: Indian Express)
-
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३२.९४ च्या सरासरीने ३११ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: PTI)
-
भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांत २८.७१ च्या सरासरीने २६६ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: ICC)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”