
विराट कोहलीने २०१४ च्या शेवटी कसोटी कर्णधारपद स्वीकारलं आणि ३१ घरच्या कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याच्या कार्यकाळात, भारताने २४ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला, तर एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसरा इंग्लंडविरुद्ध असे २ पराभव झाले. (AP Photo/Halden Krog)

सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या भूमीवर १२ कसोटी सामने खेळले. यापैकी केवळ ४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला, तर इतर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, उर्वरित ५ सामने अनिर्णित राहिले. (Express Photo)

कर्णधारपदाच्या कार्यकाळात सौरव गांगुलीने मायदेशातील २१ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १० कसोटींमध्ये विजय मिळवला, ३ पराभवांना सामोरे जावे लागले आणि ८ सामने अनिर्णित राहिले. (Source: PTI)

एमएस धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कुशल कर्णधार म्हणून ओळखला जातो. २००७ टी२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन प्रतिष्ठित ICC व्हाईट-बॉल टूर्नामेंटमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने घरच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्याच्या नेतृत्वाखाली ३१ घरच्या कसोटी सामन्यांपैकी, भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला, यामध्ये तीन पराभव आणि सहा अनिर्णित सामने राहिले. दरम्यान, धोनीच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये एक उल्लेखनीय पराभव म्हणजे २०१२ मधील इंग्लंडविरुद्ध खेळलेली मालिकेचा पराभव. (Photo Source: Reuters)

महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी मायदेशात केवळ ८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला ३ पराभवांचा सामना करावा लागला आणि ३ सामन्यांत विजय मिळवला. उर्वरित दोन कसोटी अनिर्णित राहिल्या. (Photo: Getty Images)

१९८३ चे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांचा मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात खेळल्या गेलेल्या २० सामन्यांपैकी संघाला फक्त दोनच सामने जिंकता आले आणि ४ पराभवांना सामोरे जावे लागले. उर्वरित १३ सामने अनिर्णित राहिले, एका सामन्याचा निकाल बरोबरीत लागला. (Express Photo)

माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून एक प्रभावी विक्रम नोंदवला आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने विशेषत: घरच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. अझरुद्दीन यांनी घरच्या भूमीवर २० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यात १२ विजय, तीन अनिर्णित आणि चार पराभव समाविष्ट आहेत. (Express Photo)

कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्मालाही पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर भारताच्या नुकत्याच झालेल्या मालिका पराभव झाला आहे. हा त्याचा १२ वर्षांतील पहिला पराभव ठरला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात घरच्या भूमीवर १६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला पाच पराभव पत्करावे लागले, १० विजय मिळवले आणि एक सामना अनिर्णित राहिला. (Photo : (Sportzpics))

दिवंगत भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर मायदेशात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याचा विक्रम आहे. पतौडी यांनी २७ घरच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, यामध्ये संघाने ६ सामने जिंकले, तर नऊ पराभवांना सामोरे जावे लागले आणि १२ कसोटी अनिर्णित राहिल्या. (Source: AP Photo)