-
आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील महान फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत.
-
विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेमनाथ कोहली वकील होते, तर आई सरोज कोहली गृहिणी आहेत. विराटला एक मोठा भाऊ विकास आणि मोठी बहीण भावना देखील आहेत.
-
विराटचे बालपण उत्तम नगरमध्ये गेले आणि त्याचे प्रारंभिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमधून झाले आहे. विराटला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विराट जेव्हा फक्त तीन वर्षांचा होता तेव्हा तो क्रिकेटची बॅट घ्यायचा आणि वडिलांना गोलंदाजी करायला सांगायचा.
-
क्रिकेटची आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला व्यावसायिक क्रिकेट अकादमीत पाठवण्याचा निर्णय घेतला. १९९८ मध्ये जेव्हा पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली तेव्हा विराटचे वडील प्रेमनाथ कोहली यांनी त्याला तिथे प्रवेश मिळवून दिला.
-
वयाच्या ९व्या वर्षी विराटच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा स्कूटरवरून पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीत नेले. विराटच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला इथूनच सुरुवात झाली. मात्र, विराटला सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम)
-
विराटला दिल्लीच्या अंडर-१४ संघात स्थान मिळू शकले नाही, पण विराटच्या वडिलांनी कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारण्यास नकार दिला. नंतर कठोर परिश्रम आणि मेहनतीने विराटने दिल्ली अंडर-१५ संघात स्थान मिळवले.
-
विराटच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता, जेव्हा त्याच्या वडिलांचे २००६ मध्ये निधन झाले. या दुःखद घटनेनंतर विराटने क्रिकेटला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, वडिलांच्या निधनानंतर विराटच्या वागण्यात लक्षणीय बदल झाला होता आणि त्याने पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले.
-
या घटनेनंतर विराट नव्या उर्जेने क्रिकेटच्या मैदानात परतला आणि त्याने आपल्या कारकिर्दीला नव्या उंचीवर नेले. आज विराट कोहलीचे नाव जगातील महान फलंदाजांमध्ये घेतले जाते. कसोटी असो, वनडे असो की टी-२०, प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याने स्वत: ला सिद्ध केलं आहे.
-
विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याचे बालपणीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याला पडलेलं नाव ‘चिकू’ देखील चर्चेत आहे.
-
विराट कोहलीला चाहते वेगवेगळ्या नावाने हाक मारतात, मात्र त्याचं चिकू हे नाव खूप प्रसिद्ध आहे. खरंतर, जेव्हा विराटने रणजी खेळायला सुरुवात केली तेव्हा तो त्याचे गुलाबी गाल होते, बारीक केस होते आणि गुबगुबीत होता. (वरील सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
-
विराटला पाहताच दिल्लीच्या प्रशिक्षकांना ‘चंपक’ या लहान मुलांच्या मासिकातील चिकूची आठवण झाली. त्यानंतर ते विराटला चिकू म्हणू लागले आणि हेच नाव पुढे क्रिकेटच्या मैदानावरही प्रसिद्ध झाले. (फोटो: ESPNcricinfo)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…