-
भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पीव्ही सिंधूचे विशेष स्थान आहे. देशासाठी दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी ही खेळाडू खेळासोबतच आता येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी खास करणार आहे.
-
तिला भारतातील क्रीडाप्रेमी खेळाडूंची प्रतिभा विकसित करण्यासाठी तिची भूमिका बजावायची आहे आणि त्याचीच सुरुवात तिने केली आहे.
-
सिंधूने शेअर केले फोटो
सिंधूने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत ज्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने विशाखापट्टणममध्ये स्वतःची क्रीडा अकादमी सुरू करण्याचा पाया आज घातला आहे. -
पीव्ही सिंधूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “विशाखापट्टणममध्ये ‘सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन स्पोर्ट्स एक्सलन्सची’ पायाभरणी करताना मला खूप आनंद होत आहे. ही केवळ एक संस्था नसून देशातील क्रीडा जगताचे भविष्य आहे. हे एक मोठे पाऊल आहे ज्याद्वारे आम्ही पुढील पिढीतील चॅम्पियन तयार करू आणि त्यांच्यामध्ये भारतीय खेळांबद्दल नवीन आशा निर्माण करू.”
-
यावेळी ती तिथे उपस्थित अभियंत्यांशी या अकादमीबद्दल बोलतानाही दिसत आहे. सिंधूने आज तिच्या क्रीडा अकादमीची पायाभरणी केली आहे.
-
यावेळी सिंधूने तिच्या सहकाऱ्यांचे आभारही मानले. तिने लिहिले, “आमच्या सर्व टीम आणि भागीदारांच्या पाठिंब्याने आम्ही असे काहीतरी तयार करणार आहोत जे क्रीडा जगतातील भावी पिढ्यांना सशक्त करेल.”
-
या अकादमीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून विविध खेळांमध्ये युवा खेळाडू तयार केले जाणार आहेत. आंध्र प्रदेश सरकारने या अकादमीसाठी सिंधूला २ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.
-
पॅरिस ऑलिम्पिक पीव्ही सिंधूसाठी निराशाजनक ठरले. गट फेरीतील आपले दोन्ही सामने जिंकण्यात तिला यश मिळाले होते मात्र, १६ व्या फेरीत तिला चीनच्या हे बिनजियाओ विरुद्धचा सामना गमवावा लागला. पॅरिसमध्ये तिला विशेष काही करता आलेले नसले तरी मात्र, भारताला अभिमान वाटावा अशीच या खेळाडूची कारकीर्द आहे
-
(सर्व फोटो साभार- पीव्ही सिंधू इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई