-
kl rahul and Athiya Shetty Announces Pregnancy: भारतीय फलंदाज केएल राहुलची कामगिरी अशात फारशी चांगली राहीली नाही. तो बॅटने संघासाठी फारश्या धावा करू शकला नाही आणि तो परत फॉर्ममध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान आता, पुढचे वर्ष राहुलसाठी आनंदाचे असेल असं समजतंय. (Photo: athiyashetty/instagram)
-
राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने याचा खुलासा केला आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांनीही इन्स्टाग्रामवरुन ही आनंदाची बातमी शेअर केली की हे जोडपे पुढच्या वर्षी आई-बाबा बनणार आहेत. (Photo: athiyashetty/instagram)
-
अथिया शेट्टीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘Our Beautifull blessing is coming soon 2025’ तिने या पोस्टमध्ये राहुलला टॅग केले आहे. (Photo: athiyashetty/instagram)
-
या पोस्टमध्ये बाळाचे पाय आणि तारे देखील दिसत आहेत. तसेच नजर लागू नये यासाठी पोस्टरवर काळा टीकाही बनवला गेला आहे आणि खाली राहुल आणि अथिया असे लिहिले आहे. (Photo: athiyashetty/instagram)
-
अथियाने कॅप्शनमध्ये व्हाइट हार्ट देखील पोस्ट केले आहे. या पोस्टचा स्पष्ट अर्थ असा आहे की हे जोडपे पुढील वर्षी पालक होणार आहेत. (Photo: athiyashetty/instagram)
-
या पोस्टवर सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. अथियाचा भाऊ अहान शेट्टीने पोस्टवर इमोशनल इमोजी कमेंट केले आहेत. (Photo: athiyashetty/instagram)
-
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही अभिनंदनाची कमेंट केली आहे. (Photo: athiyashetty/instagram)
-
अथिया आणि केएल राहुलने २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले. याआधी ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते. (Photo: athiyashetty/instagram)
-
केएल राहुल आणि अथिया शेट्टी अथिया शेट्टीने शेअर केलेली पोस्ट. (Photo: athiyashetty/instagram)
हेही पाहा- Photos : ‘रानबाजार’ फेम मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवारचं अजिंठा लेणीमध्ये आकर्षक फोटोशूट

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या