-
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २०२४ मध्ये आयपीएल लिलावात इतिहास घडवला. कोलकाता नाइट रायडर्सने त्याच्यावर मोठी बोली लावत २४.७५ कोटी रुपयांना संघात घेतले. अशारितीने स्टार्क आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
-
सनरायझर्स हैदराबादने २०२४ लिलावात पॅट कमिन्सवर २०.५० कोटींची मोठी बोली लावली आणि संघात सामील केले. यासह कमिन्स इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
-
इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी पंजाब किंग्सने १८.५० कोटींची बोली लावली होती. सॅम करन आयपीएल २०२३ लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
-
मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनवर आयपीएल २०२३ मध्ये १७.५० कोटींची मोठी बोली लावली होती.
-
चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२३ लिलावात इंग्लिश संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर १६.२५ कोटींची मोठी बोली लावली होती.
-
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्स संघाने २०२१ मध्ये १६.२५ कोटींची बोली लावली होती.
-
२०१५ च्या आयपीएल लिलावात युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सर्वात मोठी १६ कोटींची बोली लावली होती. युवराज सिंग हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे.
-
वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोसल पुरनसाठी आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ कोटींची तगडी बोली लावली होती आणि त्याला संघात सामील केले.
-
सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत पॅट कमिन्स हा दोन वेळा असणारा एकमेव खेळाडू आहे. पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात १५.५० कोटींची बोली लावली होती.
-
भारताचा युवा विकेटकिपर फलंदाज इशान किशनकरता मुंबई इंडियन्स संघाने २०२२ च्या लिलावात १५.२५ कोटींची बोली लावली होती. इशान हा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. (सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता,एक्सप्रेस संग्रहित फोटो)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”