-
टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी आज ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. देविशाचा जन्म १७ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबईत झाला होता.
-
या खास प्रसंगी सूर्यकुमारने देविशासोबतचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि प्रेमळ कॅप्शनसह तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या जोडप्यामधील रोमान्स आणि प्रेमाने भरलेले नाते सर्वज्ञात आहे, कारण सूर्यकुमार आणि देविशा दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत देवीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सूर्यकुमारने त्यांची पत्नी देविशासाठी एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिली आणि आतापर्यंतच्या यशाचे श्रेय देविशाच्या पाठिंब्याला आणि हृदयस्पर्शी प्रेमाला दिले.
-
सूर्याने पोस्टमध्ये त्याच्याबरोबरचा देविशाचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनवर देविशाला एक लव्ह नोट देखील समर्पित केली आहे.
-
त्याने लिहिले, माझ्या घराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या शांत साहसी आणि सर्वात मोठ्या सपोर्ट सिस्टमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
-
तुझी साथ असताना प्रत्येक स्वप्न पूर्ण होताना दिसते. प्रत्येक दिवसासाठी तुझा आभारी आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो.
-
देविशा शेट्टी ही एक यशस्वी शास्त्रीय नृत्यांगना असून आपल्या नृत्याच्या जोरावर तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देवीशा मुंबईत मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवते.
-
सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा देविशाला कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहिले होते. यानंतर तिच्या प्रेमात पडल्यानंतर दोघांची पहिली भेट २०१० साली झाली होती. (Photo Source – Devisha Shetty Insta)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”