-
आयपीएल २०२४ महालिलावात एकूण ५७४ खेळाडू सहभागी होणार असून त्यापैकी ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडू आहेत. जेय याा लिलावत आपले नशीब आजमवताना दिसणार आहे. (Photo Source – IPL X)
-
आगामी लिलावात इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सर्वात वयस्कर खेळाडू असेल. त्याचे वय सध्या ४२ वर्षे आहे. त्याची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये आहे. अँडरसन प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी होत आहे. (Photo Source – ECB X)
-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनने १.५ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे. त्याचे वय ४१ वर्षे आहे. तो गोलंदाजीबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. तो याआधी कधी आयपीएलमध्ये खेळलेला नाही. ((Photo Source – IANS X)
-
४० वर्षीय फाफ डू प्लेसिसही लिलावात नशीब आजमावताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने मागील तीन हंगामात नेतृत्त्व केले आहे. डुप्लेसिसची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. (Photo Source – IPL X)
-
मोहम्मद नबीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २४ सामने खेळले आहेत. ४० वर्षीय अफगाणिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूने १.५ कोटी रुपयांमध्ये नोंदणी केली आहे. तो सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससारख्या संघांचा भाग राहिला आहे. (Photo Source – ACB X)
-
भारताचा धडाकेबाज फिरकीपटू आर अश्विनची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. ३८ वर्षीय अश्विनला राजस्थान रॉयल्सने रिलीज केले आहे.त्याने आयपीएलमध्ये पाच संघांसाठी २१२ सामने खेळले आहेत. (Photo Source – IPL X)
-
ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर लिलावात उतरणार आहे. ३८ वर्षीय वॉर्नरची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo Source – IPL X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”