(
-
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी : भारतीय फलंदाजांनी सर्व बाद १५० अशी धावसंख्या केल्यानंतर भारताचा नवा कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर दिले आहे.
-
पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या १५०/१० अशी होती आणि ऑस्ट्रेलियाने ६७ धावा करत सात विकेट गमावल्या आणि दिवस संपला.
-
जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १०४ धावांवरच अडवले.
-
पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
-
ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त जलदगती गोलंदाजीला तोंड देताना भारताने यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीक्कल व विराट कोहली असे तीन मोहरे गमावले.
-
यावेळी भारताने तीन फलंदाजी करताना ३२ धावा करत तीन विकेट गमावल्या होत्या.
-
पुढे रिषभ पंत आणि मैदानात उतरलेला नवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारताला १५० धावांच्या सीमेवर पोहोचवले.
-
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करीत उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन यांना गमावले.
-
त्यानंतर भारताचा खेळ खालावल्याचे पाहायला मिळाले.
-
पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या ६७/७ असताना पहिला दिवस संपला.
-
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, ॲलेक्स कॅरी व नॅथन लियॉन यांनी खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या तीन विकेट सहजरीत्या घेतल्या आणि शेवटची विकेट ही हर्षित राणा या नव्या खेळाडूच्या नावावर आहे.