-
IPL २०२५ च्या लिलावाच्या पहिल्या दिवशी ७२ खेळाडू विकले गेले. या लिलावात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांना २० कोटींहून अधिक रक्कम मिळाली. (Photo: IPL)
-
पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊने त्याला २७ कोटींना खरेदी केले. (Photo: IPLT20)
-
श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. (Photo Source: PTI)
-
व्यंकटेश अय्यरला केकेआरने २३.७५ कोटींना विकत घेतले. पण काही खेळाडू असेही आहेत ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Photo: IPL)
-
आयपीएल २०२५ च्या लिलावात मिचेल स्टार्कला सर्वात मोठा फटका बसला. गेल्या हंगामात स्टार्कला ३४.७५ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक रक्कम मिळाली होती, मात्र यावेळी तो केवळ ११.७५ कोटी रुपयांना विकला गेला आहे. दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कला घेतले आहे. स्टार्कचे एकूण १३ कोटींचे नुकसान झाले आहे. (Photo Source: PTI)
-
आयपीएल २०२५ च्या लिलावात केएल राहुलला खूप जास्त किंमतीला खरेदी केले जाईल अशी अपेक्षा होती पण या खेळाडूसोबतही मोठा गेम झाला. केएल राहुल केवळ १४ कोटींमध्ये खरेदी केला गेला, तो आता दिल्ली संघात सामील झाला. गेल्या मोसमापर्यंत केएल राहुलला १७ कोटी रुपये मिळाले होते पण आता या खेळाडूला ३ कोटी रुपये कमी मिळणार आहेत. (Photo Source: PTI)
-
लिलावात ग्लेन मॅक्सवेललाही चांगलाच फटका बसला. पंजाब किंग्जने या खेळाडूला ४.२ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या मोसमात हा खेळाडू आरसीबीमध्ये ११ कोटींमध्ये खेळत होता. म्हणजे मॅक्सवेलला ६.८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Photo Source: PTI)
-
आयपीएल लिलावात इशान किशनलाही हा फटका सहन करावा लागलाय. या हंगामात किशनला सनरायझर्स हैदराबादने ११.२५ कोटींना विकत घेतले आहे. गेल्या हंगामापर्यंत किशनला प्रत्येक हंगामात १५.२५ कोटी रुपये मिळत होते. (Photo Source: PTI)
-
गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या समीर रिझवीला यावेळी पुन्हा फक्त ९५ लाख रुपये मिळाले आहेत. चेन्नईने गेल्या मोसमात समीर रिझवीवर ८.४० कोटी रुपये खर्च केले होते. (Photo Source: PTI)
हेही पाहा – Maharashtra Assembly Elections 2024: जय-पराजयानंतर आदित्य, अमित हे ठाकरे बंधू काय म्हणाले?
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ