-
IPL Auction 2025, Most Expensive IPL Buys: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, ८३ खेळाडूंची बोली लावली गेली, त्यापैकी ७२ खेळाडूंची विक्री झाली. आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आहे ज्याला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे १० सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊया
-
१०- बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील १० वा सर्वात महागडा खेळाडू आहे. ज्याला रायझिंग पुणे सुपरजायंटने २०१७ मध्ये १४.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
-
९- २०१८ पर्यंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्स होता ज्याचा राजस्थान रॉयल्सने १२.५ कोटी रुपयांना लिलाव केला होता. (फोटो- बेन स्टोक्स/एफबी)
-
८- आयपीएल २०१९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने वरुण चक्रवर्तीला ८.४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. (फोटो- वरुण चक्रवर्ती/एफबी)
-
७- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत जयदेव उनाडकट ७व्या स्थानावर आहे. २०१९ मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने ८.४ कोटी रुपयांना विकत घेतले. (फोटो- जयदेव उनाडकट/एफबी)
-
६- आयपीएल २०२० मधील सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स होता ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. (फोटो- पॅट कमिन्स/एफबी)
-
५- राजस्थान रॉयल्सने २०२१ मध्ये ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो- ख्रिस मॉरिस/इन्स्टा)
-
४- इशान किशन हा आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात महाग किंमतीत खरेदी केला जाणारा खेळाडू आहे. इशान किशनला २०२२ मध्ये मुंबई इंडियनने १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. (फोटो- इशान किशन/एफबी)
-
३- आयपीएल इतिहासातील सर्वात महाग विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत सॅम कुरन तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याला २०२३ मध्ये पंजाब किंग्जने १८.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. (फोटो- सॅम करन/एफबी)
-
२- २०२४ IPL मधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क होता ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. (फोटो- मिचेल स्टार्क/एफबी)
-
१- ऋषभ पंतला यंदा लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले आहे. (फोटो- ऋषभ पंत/एफबी)
हेही पाहा- आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल