-
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या बहिणीचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी सूर्यकुमार यादवच्या जवळचे लोक उपस्थित होते.
-
सूर्यकुमारची बहीण दिनल यादव हिचा विवाह इंजिनियर कृष्ण मोहनशी झाला. यानंतर सूर्याने त्यांना शुभेच्छा देत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दिनल ही सूर्यकुमार यादवची धाकटी बहीण आहे. ती लाईमलाईटपासून दूर राहणेच पसंत करते.
-
सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावनिक पोस्ट करताना लिहिले की, आयुष्याच्या या सुंदर नवीन अध्यायात तुला पाऊल ठेवताना पाहणे हा माझ्यासाठी सर्वात भावनिक क्षण होता. बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रूपात पाहण्यापर्यंत.
-
मला किती अभिमान आणि आनंद वाटतो, हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तू आमच्या सर्वांसाठी नेहमीच आनंदाचा आणि प्रेमाचा स्रोत राहिली आहेस.
-
तुम्हाला आता एक नवीन प्रवास सुरू करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हा दोघांनाही प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
-
सूर्यकुमार यादवने बहिणीच्या लग्नासाठी दोन आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबईसाठी खेळू शकणार नसल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला आधीच दिली होती.
-
तो ३ डिसेंबरला आंध्रविरुद्ध मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यातून पुनरागमन करणार आहे. या सामन्यात सूर्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता कमी असून श्रेयस अय्यर कर्णधार असेल.
-
सूर्याला मुंबईसाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे. मुश्ताक अली ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांनंतर २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो सहभागी होणार आहे. (Photo Source – Suryakumar Yadav Insta)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार