य
-
भारताची माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने २२ डिसेंबर रोजी इंजिनीयर आणि व्यावसायिक व्यंकट दत्ता साईबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला होता.
-
लग्नसोहळ्यानंतर काही दिवसांनी आता सिंधूने त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही क्षणांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. सिंधूच्या लग्नाचे सर्व विधी दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार पार पडले.
-
सिंधूने गोल्डन क्रीम रंगाची साडी परिधान केली आहे आणि दक्षिणात्य परंपरेप्रमाणे दागिनेही परिधान केले आहेत. तर तिचा नवराही पारंपारिक लग्नजोड्यात दिसत आहे.
-
पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्या दक्षिणात्य परंपरेमधील अक्षता अर्पण एका विधीच्या खास क्षणाचे सुंदर फोटोही तिने शेअर केले आहेत. या विधीमध्ये हळदीमध्ये मिक्स केलेले तांदूळ वर-वधू एकमेकांच्या डोक्यावर टाकतात.
-
पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक आहेत. पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकिय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव यांचे चिरंजीव आहेत.
-
फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन (FLAME) विद्यापीठातून त्यांनी लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.(वरील सर्व फोटो- @pvsindhu1)
-
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी २०१८ मध्ये व्यंकट दत्ता साई यांनी याच संस्थेतून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए देखील मिळवले. (फोटो-@SachinTendulkar)