-
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने अलीकडेच तिच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे काही वेळातच व्हायरल झाले आहेत. सिंधूने 22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूर येथे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीज, हैदराबादचे कार्यकारी संचालक व्यंकट दत्ता साई यांच्याशी विवाह केला आहे.
-
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या हळदीच्या या फोटोंमध्ये सिंधू आणि तिचा पती व्यंकट दत्ता साई दोघेही आनंदात आणि उत्साहात दिसत आहेत. संपूर्ण सोहळ्यात परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. उदयपूरमधील या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये मित्र आणि कुटुंबियांसोबत मजेदार आणि प्रेमाने भरलेले क्षण पाहायला मिळाले.
-
फुलांनी सजवलेल्या मंडपात हळदी समारंभाला एखाद्या सणासुदीचे रूप आले होते. फोटोंमध्ये मित्र परिवार आणि कुटुंबीयांनी देखील सिंधू आणि वेंकट यांना शुभेच्छा दिल्या. सिंधूच्या हळदीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
-
सिंधूने हळदी समारंभासाठी ASAL by Abu Sandeep यांनी डिझाईन केलेला अतिशय सुंदर आउटफिट परिधान केला होता, या ड्रेसमध्ये चांदीचे काम नक्षीकाम केलेले होते.
-
सिंधूने यावेळी पारंपरिक दागिने परिधान केले होते. Vaidaan ने डिझाइन केलेले तिचे दागिने संपूर्ण लूकमध्ये भर घालत होते.
-
दुसरीकडे, व्यंकट दत्ता साईने Mard by Abu Sandeep यांनी डिझाईन केलेला पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. यावेळी त्याने पांढरा कुर्ता परिधान केला आहे, ज्यामध्ये हलकं नक्षीकाम केलेलं आहे.
-
पीव्ही सिंधूने नेहमीच खेळाच्या माध्यमातून भारताला गौरव मिळवून दिला आहे आणि आता तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही नवीन इनिंग सुरू केली आहे. दरम्यान, पीव्ही सिंधू भारतीय बॅडमिंटनमधील एक असे नाव आहे ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती भारताची पहिली आणि एकमेव बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि ऑलिम्पिकमध्ये सलग दोनदा पदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे.
-
(सर्व फोटो साभार- पीव्ही सिंधू इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही