-
आयसीसी स्पर्धेतील सर्वात मोठी लढत भारत वि. पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आज २३ फेब्रुवारी रविवारी दुबईत होत आहे. (Photo: Indian Express)
-
१९ फेब्रुवारीपासून हा रोमहर्षक खेळ सुरू झाला आहे. या स्पर्धेत फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आज आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च १० सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो – एपी)
-
ख्रिस गेल
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने या स्पर्धेत १७ सामन्यांत ७९१ धावा केल्या आहेत. तो सर्वात अव्वल स्थानी आहे. (Photo: Indian Express) -
महेला जयवर्धने
ख्रिसच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा फलंदाज महेला जयवर्धने. त्याने एकूण २२ सामन्यांमध्ये ७४२ धावा बनवल्या आहेत. (Photo: Indian Express) -
शिखर धवन
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिखर धवन याने १० सामन्यांमध्ये ७०१ धावसंख्या केली आहे. (Photo: Indian Express) -
कुमार संगकारा
श्रीलंकेच्या या खेळाडूने २२ सामन्यांमध्ये ६८३ रन्स केले आहेत. (Photo: Indian Express) -
सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या यादीत नाव कमावले आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये ६६५ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express) -
जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने या स्पर्धेत ६५३ रन केले आहेत. त्याने १७ सामने खेळत ही धावसंख्या केली आहे. (Photo: Indian Express) -
राहुल द्रविड
भारताय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयसीसीच्या १९ सामन्यांत ६२७ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express) -
रिकी पाँटींग
ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने १८ सामन्यांमध्ये ५९३ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express) -
शिवनारायण चंद्रपॉल
वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलने १६ मॅचमध्ये ५८७ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express) -
सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्या याने २० सामन्यांत ५३६ धावा केल्या आहेत. (Photo: Indian Express)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख