-
भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत धडकला आहे. (Photo: Social Media)
-
भारताने पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Photo: Social Media)
-
भारताने २०००, २००२, २०१३, २०१७ आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. (Photo: Social Media)
-
आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक आणि टी२० विश्वचषकातील तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत कितीवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग याबद्दलच जाणून घेऊयात… (Photo: Social Media)
-
एकदिवसीय विश्वचषक
भारताने आतापर्यंत चार वेळा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १९८३, २००३, २०११ आणि २०२३ मध्ये भारत अंतिम सामने खेळला आहे. त्यातील १९८३ व २०११ च्या विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले आहे. (Photo: Social Media) -
टी२० विश्वचषक
भारताने आतापर्यंत ३ वेळा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये भारताने अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: Social Media) -
यापैकी २००७ व २०२४ मध्ये भारताने हे करंडक आपल्या नावावर केले आहेत. (Photo: Social Media)
-
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
भारत आतापर्यंत २ वेळा २०१९ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडकला आहे. पण दोन्हीवेळा भारताला यश मिळाले नाही. (Photo: Social Media)

“आम्हीसुद्धा भारताकडून…”, संसदेतील पहिल्याच भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा