-
उद्या ९ मार्च २०२५ रोजी भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होणार आहे. (Photo: ICC)
-
दुबईतील मैदानावर हा सामना पार पडणार आहे, दरम्यान आज आपण चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये जाऊन शतक ठोकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Photo: Social Media)
-
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आतापर्यंत एकूण ६ शतके झळकावली आहेत. या यादीमध्ये सौरव गांगुली ते शेन वॉटसन यांच्या नावांचा समावेश आहे. (Photo: Social Media)
-
सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला. न्यूझीलंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. त्यावेळी गांगुलीची ११७ धावांची तडाखेबाज खेळी पाहायला मिळाली. (Photo: Social Media) -
क्रिस केर्न्स
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू क्रिस केर्न्सने २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले होते. या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. (Photo: Social Media) -
फखर जमान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात फखर जमानने शतक झळकावले होते. फखरच्या बॅटमधून ११४ धावांची खेळी पाहायला मिळाली. (Photo: Social Media) -
मायकेल ट्रेस्कोथिक
इंग्लंडचा माजी सलामीवीर फलंदाज मायकेल ट्रेस्कोथिकने वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ धावांची इनिंग खेळली होती. -
फिलो वॉलिस
चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज फिलो वॉलिसने १०३ धावांची खेळी केली होती. (Photo: Social Media) -
शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसनने २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून १०५ धावांची इनिंग पाहायला मिळाली होती. (Photo: Social Media)

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच