-
शाहरुख खानला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जाते आणि सध्या तो त्याच्या आयपीएल टीम केकेआरमुळे चर्चेत आहे. (Photo: Social Media)
-
शाहरुख खान हा आयपीएल संघ केकेआरचा सह-मालक आहे आणि तो दरवर्षी यामधून कोट्यवधी रूपये कमावतो. (Photo: Social Media)
-
पण तुम्हाला माहिती आहे का की केकेआर व्यतिरिक्त शाहरुख खान इतर तीन क्रिकेट संघांचाही मालक आहे. (Photo: Social Media)
-
चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)
-
शाहरुख खान अबू धाबी नाईट रायडर्स, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्सचा मालक आहे. (Photo: Social Media)
-
किंग खानचे हे सर्व संघ रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत नाईट रायडर्स ग्रुपचा भाग आहेत. (Photo: Social Media)
-
ट्रिनबागो नाईट रायडर्स (टीकेआर)
२०१५ मध्ये शाहरुखने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो रेड स्टील फ्रँचायझीमध्ये ५०% हिस्सा विकत घेतला, जी कॅरिबियनमध्ये खेळला जाणारा एक T20 स्पर्धा होती. (Photo: Social Media) -
त्याच वर्षी संघाने पहिले विजेतेपद जिंकले. पुढच्या हंगामात, शाहरुखने संघाचे नूतनीकरण केले, त्याचे नाव बदलून ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) ठेवले आणि KKR सारखाच लोगो तयार केला. (Photo: Social Media)
-
२०२२ मध्ये, नाईट रायडर्स ग्रुपने महिला टीकेआर संघ देखील स्थापन केला, जो महिला सीपीएलमध्ये भाग घेतो. (Photo: Social Media)
-
अबू धाबी नाईट रायडर्स
अबू धाबी नाईट रायडर्स संघ युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय लीग टी२० (ILT20) सहभागी होतो. शााहरुखची ही टीम अबू धाबी येथे आहे. (Photo: Social Media) -
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये भाग घेतो. लीगची पहिली आवृत्ती २०२३ मध्ये खेळवण्यात आली होती. (Photo: Social Media) -
नाईट रायडर्स क्रिकेट ग्रुपने साउथ आफ्रिकेच्या टी२० ग्लोबल लीगमध्ये एक फ्रँचायझी देखील विकत घेतली होती, जी नंतर टेलिकास्टच्या समस्यांमुळे बंद करण्यात आली आणि नंतर ती मझान्सी सुपर लीग नावाने सुरू झाली. (Photo: Social Media) हेही पाहा- IPL मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे ५ खेळाडू, पहिल्या क्रमांकावर RCB चा क्रिकेटर

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल