-
आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सचे हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांची वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोट म्हणून राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा आयपीएलमध्ये कोच म्हणून दिसणार आहेत. पण यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच द्रविड यांचे व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल होत आहेत.
-
राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड यांना हंगामाच्या काही दिवसाआधी क्लब क्रिकेट खेळत असताना पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पण तरीही द्रविड संघाबरोबर या सीझनसाठी उपस्थित आहेत.
-
राहुल द्रविड व्हिलचेअर आणि कुबड्यांच्या आधारे संघाचे सराव सत्र, सामने, टीम मिंटिंग्स याला उपस्थित असतात.
-
राहुल द्रविड यांना दुखापत असूनही संघाबरोबर उपस्थित असताना आणि पिचची पाहणी करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत आणि राहुल द्रविड यांचे कौतुकही केले जात आहे.
-
IPL 2025 मधील सहावा सामना केकेआर वि. आरआर यांच्यात खेळवला गेला, ज्यामध्ये राजस्थान संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
-
केकेआर-राजस्थान सामन्यापूर्वी राहुल द्रविड व्हिलचेअरवरून केकेआरच्या खेळाडूंची भेट घेताना दिसले.
-
सध्याचा केकेआरचा कर्णधार जो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिला होता, त्यावेळेस राहुल द्रविड संघाचे कोच होते…. द्रविड दिसताच अजिंक्य रहाणे मोठ्या स्मितहास्यासह त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्याचा व्हीडिओही पाहायला मिळत आहे.
-
राहुल द्रविड सातत्याने राजस्थानच्या संघातील खेळाडूंशी चर्चा करताना दिसतात.
-
राजस्थान रॉयल्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. रियान परागच्या नेतृत्त्वाखालील संघ दुसऱ्या सामन्यातही पराभूत झाला,
-
केकेआरने फिरकीसाठी अनुकूल असलेल्या गुवाहाटीच्या खेळपट्टीवर राजस्थानचा ८ विकेट्सने पराभव केला.
-
क्विंटन डि-कॉकच्या ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने हा विजय सहज नोंदवला. त्याच्या या खेळीचं कौतुक करण्यासाठी राहुल द्रविड कुबड्यांच्या आधारे मैदानावर पोहोचले आणि त्याला हात मिळवत शाबासकी दिली. (वरील सर्व फोटो-@RajasthanRoyals @KKR)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा