-
Shikhar Dhawan Girlfriend: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन सध्या त्याच्या लव्हलाइफमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शिखर धवनने स्वतः याबाबत पुष्टी केली आहे की तो कोणाला तरी डेट करत आहे.
-
त्याच्या एका शोमध्ये जेव्हा त्याला त्याच्या प्रेयसीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने तिचे नाव सांगितले नाही, परंतु संभाषणादरम्यान त्यांच्या नात्याविषयी पुष्टी केली आहे.
-
शिखर धवनचे नाव सोफी शाइनशी जोडले जात आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, शिखर धवनबरोबर एक मिस्ट्री गर्ल दिसली होती, तिचे नाव अनेकांनी सोफी शाइन असल्याचे सांगितले.
-
सोफी शाईन ही भारतीय नसून आयर्लंडची नागरिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी शाइन ही एक आयर्लंडमधील एका मोठ्या फर्ममध्ये प्रोडक्ट कंसल्टंट म्हणून काम करते.
-
सोफी शाइन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, पण सोफी शाइनला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे प्रवास. सोफी शाइनच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर तिला प्रवासाची खूप आवड आहे.
-
तिने स्वित्झर्लंड, इटली, दुबई, आफ्रिका, स्पेन आणि भारत यासह अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.
-
सोफी शाईनने हिमाचल प्रदेश, आग्रा ते दिल्ली असा प्रवास केला आहे. सोफी शाइन अनेकदा भारतातही फिरण्यासाठी येते.
-
सोफी शाइन केवळ स्टायलिशच नाही तर खूप फिट देखील आहे. (फोटो साभार – Sophie Shine, Shikhar Dhawan/ Instagram)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral