-
IPL 2025: आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा क्रिकेटचे चाहते आनंद घेत आहेत. ही स्पर्धा २२ मार्च रोजी सुरू झाली आहे. (Photo: Social Media)
-
यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात संघांनी बराच पैसा खर्च केला होता. (Photo: Social Media)
-
कोट्यवधी रुपये खर्च करून संघांनी स्टार खेळाडूंचा समावेश केला होता. (Photo: Social Media)
-
यातील काही स्टार खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत, तर काही खेळाडू खूप महागडे असूनही चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत. (Photo: Social Media)
-
ऋषभ पंत
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले. आतापर्यंत त्याने ४ सामन्यात ४.७५ च्या सरासरीने आणि ५९.३८ च्या स्ट्राईक रेटने १९ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media) -
राशिद खान
गुजरात टायटन्सने राशिद खानला १८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. त्याने चार सामन्यांत १४३ च्या सरासरीने फक्त एक विकेट घेतली आहे. (Photo: Social Media) -
युझवेंद्र चहल
पंजाब किंग्जने मेगा लिलावात युझवेंद्र चहलला १८ कोटी रुपयांना विकत घेतले. चहललाही यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. (Photo: Social Media) -
अभिषेक शर्मा
सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अभिषेकने आतापर्यंत ५ सामन्यात १०.२ च्या सरासरीने ५१ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media) -
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६.३० कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. या मोसमात आतापर्यंत रोहित शर्माची बॅट काही कामगिरी करू शकलेली नाही. (Photo: Social Media) हेही पाहा – हरभजन सिंग, अक्षर पटेल ते कुलदीप यादव; ‘या’ ८ भारतीय फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

Horoscope Today: अभिजात मुहूर्ता दरम्यान काय केल्याने मेष ते मीनला होईल प्रचंड लाभ; वाचा १२ राशींचे रविवारचे राशिभविष्य