-
मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू केव्हीन डी ब्रुयनने त्याचा संघ सहकारी जेम्स मॅकएटीसह नुकतेच ‘एआय शोडाउन’ नावाच्या एका क्विझ सेगमेंटमध्ये भाग घेतला होता.
-
या क्विझमध्ये केव्हीन डी ब्रुयन आणि जेम्स मॅकएटीला युरोपमध्ये पाच सर्वात लोकप्रिय खेळांची नावे विचारण्यात आली होती.
-
दरम्यान फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, टेनिस आणि फॉर्म्युला १ हे अनुक्रमे युरोपीय खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत, हे समजल्यानंतर डी ब्रुयनेला धक्का बसला.
-
“या यादीत क्रिकेट दुसऱ्या क्रमांकावर कसे असू शकते? हे खरे नाही” असे डी ब्रुयनने आश्चर्यचकित होऊन म्हटले.
-
डी ब्रुयन पुढे म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मला युरोपमध्ये क्रिकेट पाहणारा कोणीही माहित नाही.”
-
डी ब्रुयन हा बेल्जियमचा एक व्यावसायिक फुटबॉलपटू आहे. तो इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीसाठी आणि बेल्जियमच्या राष्ट्रीय संघात मिडफिल्डर म्हणून खेळतो.
-
ब्रुयनला पासिंग आणि खेळातील इतर कौशल्यांसाठी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जाते.
-
ब्रुयनने मँचेस्टर सिटीकडून प्रीमियर लीग, एफए कप आणि यूईएफए चॅम्पियन्स लीगसह अनेक जेतेपदे जिंकली आहेत.
-
डी ब्रुयनेला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याला त्याच्या पिढीतील सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक मानले जाते. (सर्व फोटो सौजन्य: @KevinDeBruyne/X)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना