-
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या व्यवसायिक आयुष्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
विराटने पुमासोबरोबरचा त्याचा आठ वर्षांचा करार संपुष्टात आणत त्यांचा ३०० कोटी रुपयांच्या कारार नूतनीकरणाचा प्रस्ताव नाकारला आहे.
-
प्यूमाबरोबर पुन्हा करार करण्याऐवजी, विराटने अॅजिलिटास स्पोर्ट्स या नवीन भारतीय स्पोर्ट्सवेअर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि त्याला आकार देण्यात सक्रिय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
-
विराट कोहलीच्या या कृतीतून तो एंडोर्समेंट फीपेक्षा मोठा विचार करत, दीर्घकालीन मूल्याकडे पाहत आहे असे दिसते.
-
२०१७ मध्ये, कोहलीने भारतातील खेळातील सर्वात हाय-प्रोफाइल करारांपैकी एक असलेल्या प्यूमाच्या ८ वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराद्वारे त्याने ११० कोटी रुपये कमावले.
-
या कराराद्वारे विराटने त्याचा वन ८ ब्रँड प्यूमाबरोबर भागीदारीत लाँच केला होता. यातून त्याने सुमारे २५० कोटी रुपयांची कमाई केली.
-
दरम्यान अॅजिलिटास ही एक नवी कंपनी आहे, ज्याची स्थापना २०२३ मध्ये प्यूमा इंडिया आणि आग्नेय आशियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी केली होती.
-
अॅजिलिटासने कन्व्हर्जंट फायनान्स आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सकडून आधीच ६०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
-
अॅजिलिटास कंपनीने अलीकडेच देशातील प्रमुख स्पोर्ट्स फूटवेअर उत्पादक कंपनी मोचिको शूज विकत घेतली आहे. (सर्व फोटो सौजन्य: @imVkohli/X)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल