-
भारतीय संघ आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाला त्यांच्या चाहत्यांचा तर पाठिंबा आहेच पण त्याचसोबत संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसीदेखील त्यांना चिअर करताना दिसतील.
-
पत्नी साक्षी धोनी आणि चाहत्यांचा मिळणार पाठिंबा यामुळेच महेंद्रसिंग धोनी आयसीसी टी-२० विश्वचषकातील सर्वात बलाढ्य असा कर्णधार मानला जातो. महेंद्रसिंग धोनीला एक वर्षाची ‘झिवा’ नावाची चिमुकली आहे.
-
भारताचा सलामीवीर रोहित शर्माची पत्नी रितीका नेहमीच त्याच्या पाठिशी असते. सहा वर्षांच्या प्रेमानंतर या दोघांनी डिसेंबरमध्ये लग्न केले.
-
आयशा मुखर्जी नेहमीच पती शिखर धवन आणि त्याच्या टिमला पाठिंबा दर्शविताना दिसते.
-
भारताचा सुप्रसिद्ध खेळाडू युवराज सिंगचा गेल्याच वर्षी अभिनेत्री हेझल किंच सोबत साखरपुडा झाला.
-
सुरेश रैनाने २०१५ मध्ये प्रियांका चौधरीशी लग्न केले.
-
रवींद्र जडेजाने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रिवा सोलंकीसोबत साखरपुडा केला.
-
अजिंक्य रहाणेने राधिका धुपवकर हिच्याशी विवाह केला आहे.
-
लहानपणापासून एकमेकांचे मित्र असलेले अश्विन आणि प्रिथी यांनी २०११ साली लग्न केले. २०१५ साली प्रिथीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
आशिष नेहरा आणि रुशमा यांनी २००९ साली विवाह केला. या दोघांना आरुष हा मुलगा आहे.
-
हरभजन सिंहचे बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरासोबत सूत जुळले.
-
२०१४ मध्ये मुंबई येथे एका खासगी समारंभात मोहम्मद शमीने मॉडेल हसिन जहानशी विवाह केला.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”