-
विश्वचषक, पाकिस्तान आणि विराट कोहली हे पुन्हा एकदा भारताचे विजयाचे समीकरण ठरले. विश्वचषकाचा इतिहास बदलू, हे पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांचे बोल त्याने खोटे ठरवले. ईडन गार्डन्सवरील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध कधीच विजय मिळवता आला नव्हता. तो इतिहास मात्र नक्की बदलला गेला. शनिवारी रात्री ‘विजयाचा विराटाध्याय’ लिहिला गेल्यानंतर भारतीय चाहत्यांनी शानदार जल्लोष साजरा केला.
-
पाकिस्तानच्या ११८ धावांचा पाठलाग करताना भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला.
-
ईडन गार्डन्सवर लोटलेल्या भारतीय चाहत्यांच्या निळ्या महासागराचा उत्साह काही तासांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसापेक्षा उत्कट होता. यात पाकिस्तानी चाहते मात्र ओघानेच दिसत होते.
-
सुरेश रैनाच्या आठव्या षटकात शार्जिल खानचा झेल घेण्यासाठी पंडय़ा लाँग ऑनवरून मिडऑनपर्यंत पुढे सरसावला आणि सूर मारून झेल घेतला. हा अशक्यप्राय झेल टिपून हार्दिक पंडय़ाने क्रिकेटरसिकांची वाहवा मिळवली. पण या धोकादायक प्रयत्नानंतर त्याला जागेवरून उठायला थोडा वेळ लागला. मग डॉक्टरांसोबत त्याने मैदान सोडले. पण काही काळाने तो पुन्हा मैदानावर अवतरला.
-
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला निर्धारित षटकांत ५ बाद ११८ धावसंख्येवर रोखले. याचे श्रेय अर्थातच भारताच्या फिरकी गोलंदाजांना जाते. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना या तीन फिरकीपटूंनी ८ षटकांत फक्त ३६ धावा दिल्या. या तिघांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलेच चकवले. त्यांच्या मोठय़ा भागीदाऱ्या होऊ दिल्या नाही. पाकिस्तानकडून सर्वाधिक २६ धावा अनुभवी शोएब मलिकने काढल्या. त्याने १६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ही खेळी साकारली.
-
शार्जिल खान (१७) आणि अहमद शेहझाद (२५) यांनी ३८ धावांची सलामी देत पाकिस्तानला सावध सुरुवात करून दिली. रैनाच्या गोलंदाजीवर शार्जिल माघारी परतला आणि मग शाहीद आफ्रिदी (८) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र त्याने निराशा केली. १२व्या षटकात पाकिस्तानची ३ बाद ६७ अशी स्थिती होती. त्यावेळी हा संघ धावांचे शतक तरी ओलांडेल का, याबाबत शंका होती. मात्र शोएब आणि उमर अकमल यांनी मग धावांचा वेग वाढवला. पंडय़ाच्या १४व्या षटकात दोघांनीही एकेक षटकार खेचले. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या १५व्या षटकात मलिकने दोन चौकार मारले.
-
भारताच्या डावात रोहित शर्मा (१०) आपल्या आवडत्या स्टेडियमवर फटकेबाजीला न्याय देऊ शकला नाही.
-
पाकिस्तानने मात्र फिरकीपटू इमाद वसिमला वगळून मोहम्मद समीला संघात स्थान देण्याचा निर्णय विलक्षण यशस्वी ठरला. त्याने संघाच्या पाचव्या आणि आपल्या पहिल्याच षटकात लागोपाठच्या चेंडूवर अनुक्रमे शिखर धवन (६) आणि सुरेश रैना (०) यांना तंबूची वाट दाखवली.
-
शिखर धवन
-
भारताची ५ षटकांत ३ बाद २३ अशी अवस्था झाल्यावर मैदानावर शांतता पसरली. मग विराट कोहली आणि युवराज सिंगने आत्मविश्वासाने खेळपट्टीवर उभे राहात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.
-
ICC World XI : गेल्या दोन वर्षांत कोहलीच्या विविध इंनिंग्जने तो भारतीय फलंदाजीच्या सम्राटपदाचा अंगरखा परिधान करून, रत्नमाला घालून उभा आहे.
-
धोनी
-
भारताच्या ढासळणाऱ्या डावाला हिंमतीने सावरत विराटने ३७ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी करीत नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. मोहम्मद इरफानच्या १६व्या षटकात विराट विजयाच्या आवेशातच खेळला. दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारल्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार खेचला. त्यानंतर स्क्वेअर लेगला एकेरी धाव घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
-
-
भारत-पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते दोन्ही देशांतील मान्यवरांचे खास सत्कार करण्यात आले.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान, वसिम अक्रम, इंजमाम उल हक आणि वकार युनूस यांचा समावेश होता. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. -
२०१२मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळीसुद्धा अशा प्रकारे दिग्गज खेळाडूंच्या सत्काराची योजना आखण्यात आली होती.
अमिताभ यांनी आपल्या भाषणात आधी कोलकातावासीयांशी बंगाली भाषेत संवाद साधला. ‘‘जो संघ सर्वोत्तम खेळेल, तो जिंकेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचेसुद्धा आम्ही यशस्वीपणे यजमानपद सांभाळू.’’ -
‘‘पाकिस्तानी क्रिकेटमधील दिग्गज मंडळी व्यासपीठावर आहेत, हा अतिशय चांगला योग आहे. हा सामना रंगतदार होईल, अशी आशा आहे. चला सर्वानी क्रिकेटचा आनंद लुटूया,’’ असे सचिनने या वेळी सांगितले.
-
भारत-पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते दोन्ही देशांतील मान्यवरांचे खास सत्कार करण्यात आले.
-
भारत-पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते दोन्ही देशांतील मान्यवरांचे खास सत्कार करण्यात आले.
-
इम्रान म्हणाले, ‘‘ईडन गार्डन्सवरील शेवटच्या सामन्यातील निकालच अपेक्षित आहे.’’

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”