भारतीय संघापुढे जगज्जेतेपदाचे स्वप्न बघता बघता पुन्हा चालून आले आहे. ते फक्त आता दोन पावलांवर येऊन ठेपले आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्धचा उपांत्य सामना आणि मग ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर अंतिम फेरी. विंडीज विरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मुंबईत कसून सराव केला. (छाया- केविन डिसोझा) -
आत्तापर्यंतच्या वाटचालीत भारतीय संघाचा तारणहार ठरलेला विराट कोहली सराव करताना. (छाया- केविन डिसोझा)
-
भारत आणि विंडीज यांच्यात ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी उभय संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. (छाया- केविन डिसोझा)
-
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील तीन सामन्यांपैकी विंडीजची कामगिरी २-१ अशी सरस आहे. अगदी वानखेडेवरील गेल्या काही वर्षांचा वेध घेतल्यास २०११ मध्ये भारत-विंडीज कसोटी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली होती. (छाया- केविन डिसोझा)
-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे. आयसीसीच्या परवानगीने बीसीसीआयने २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू मनीष पांडेचा भारतीय संघात समावेश केला आहे. (छाया- केविन डिसोझा)
-
भारताचा कर्णधार एम.एस. धोनी नेटमध्ये सराव करताना.
-
विश्वचषकाच्या सुरूवातीला जामठात न्यूझीलंडविरुद्ध रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च फसला आणि हरला. मग कोलकातामध्ये आणि मोहालीत विराटच्या अद्वितीय खेळींच्या बळावर भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना हरवले. (छाया- केविन डिसोझा)
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”