-
टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत नामिबिया क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पात्रता सामन्यात नामिबियाने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव करत गट अ मधून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले.
-
कसोटी खेळणारा आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी बाद १२५ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात नामिबियाने १८.३ षटकांत २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
-
कर्णधार गेरहार्ड इरास्मसच्या (नाबाद ५३) शानदार अर्धशतकाच्या जोरावर नामिबियाने हा विजय नोंदवला.
-
इरास्मससोबत डेव्हिड वीसने (नाबाद २८) चांगली फलंदाजी केली. वीसने डावाच्या १५ व्या षटकात सलग चेंडूंत दोन षटकार मारून सामना नामिबियाच्या दिशेने फिरवला. गोलंदाजीत वीसने २२ धावांत २ बळीही घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.
-
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेव्हिड वीस या वर्ल्डकपमध्ये नामिबियाकडून खेळत आहे.
-
वीसच्या वडिलांचा जन्म नामिबियामध्ये झाला होता आणि त्याचे तिथे वडिलोपार्जित घरही आहे. २०१७मध्ये डेव्हिड वीसने कोल्पॅक करार केला, त्यानंतर तो ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळू शकला नाही, म्हणून त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेव्हिड वीस खेळला होता.

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य