-
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेदरम्यान पती शोएब मलिकसोबत भारताची सानिया मिर्झा पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये आहे.
-
यादरम्यान शोएब आणि सानियाने मुलगा इझान मिर्झा मलिकचा तिसरा वाढदिवस पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरा केला.
-
सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इझानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा क्रीडाविश्वातील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते.
-
सानिया मिर्झाने इझानच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली, “माझ्या संपूर्ण जगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तीन वर्षांपूर्वी या दिवशी मी तुझी आई म्हणून पुनर्जन्म घेतला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद”, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
इझानसोबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि त्याची पत्नी.
-
पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज आणि त्याच्या पत्नीने इझानचा वाढदिवस साजरा केला.
-
इझानसोबत संवाद साधताना हाफीज.
-
पाकिस्तान संघाचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास अतिशय नेत्रदीपक ठरला आहे, त्यांनी तिन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण संघात आनंदाचे वातावरण आहे.

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”