-
टी-२० विश्वचषक २०२४ मधील आठव्या सामन्यात रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावलून रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ३७ चेंडूचा सामना करताना ४ चौकार ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा करत विक्रमांची रांग लावली.
-
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
-
रोहित शर्माने १४४ डावात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठणारा तो विराट कोहली आणि बाबर आझमनंतरचा तिसरा फलंदाज आहे.
-
आयर्लंडविरुद्ध खेळायला उतरताच रोहित टी-२० विश्वचषकाचा सलग नववा हंगाम खेळणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्यानंतर या यादीत बांगलादेशच्या शाकिब अल हसनचा क्रमांक लागतो.
-
रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू विराट कोहली आणि श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी ही कामगिरी केली होती.
-
रोहितने आता टी-२० क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझमला मागे टाकले आहे. रोहितच्या टी-२० क्रिकेटमध्ये मध्ये ४०२६ धावा आहेत, तर बाबर आझमच्या ४०२३ धावा आहेत.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक भारतीय संघाच्या विजयाचा भाग असणार रोहित शर्मा (३००*) तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे विराट कोहली (३१४*) आणि सचिन तेंडुलकर (३०७) आहे.
-
रोहित शर्मा (२८६०) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत विराट कोहली (२९००) आणि बाबर आझम (३०८१) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
रोहित शर्माने कर्णधार म्हणून धोनीला मागे टाकत टी-२० मध्ये भारताला सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली ४१ (७२) सामने आणि रोहितच्या नेतृत्त्वाखाली ४२ (५५) सामने जिंकलेत. (Photo-BCCI X)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य