-
टी-२० विश्वचषक २०२४ मधील अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, सौरभ नेत्रावलकरचा जन्म मुंबईत झाला हे क्वचितच कोणाला माहित असेल. इतकेच नाही तर सौरभने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी १९ धावांची गरज होती. पण सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये १३ धावा दिल्या आणि इफ्तिखार अहमदची विकेटही घेतली.
-
डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झाला. त्याने २०१३ मध्ये कर्नाटकविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
-
२०१० मध्ये आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो केएल राहुल, मयंक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मा यांचा माजी सहकारी आहे.
-
भारतातील वाढत्या स्पर्धेमुळे, त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची जास्त संधी मिळाली नाही. यानंतर २०१५ मध्ये सौरभ यूएसएला गेला आणि तब्बल ९ वर्षांनी त्याने इतिहास रचला.
-
सौरभ नेत्रावळकरची पहिल्यांदा २०१८ मध्ये यूएस संघात निवड झाली होती आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याची कर्णधारपदी निवड झाली. सौरभने २०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायर बी स्पर्धेत भाग घेतला.
-
सौरभने त्या स्पर्धेतील एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. टी-२० क्रिकेटमधील एका सामन्याक ५ विकेट घेणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला.
-
सौरभ हा एक प्रतिभावान सॉफ्टवेअर अभियंता देखील आहे. तो ओरॅकलमध्ये प्रधान अभियंता म्हणून काम करतो. मात्र, त्याचा पगार किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-
३२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरची एकूण संपत्ती जवळपास दोन मिलीयन डॉलर इतकी आहे. यामध्ये त्याच्या पगार, जाहिराती, करार आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. (Photo Source – Saurabh Netravalkar Insta )

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार