-
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २००७ मध्ये डरबन येथे झाला होता. हा सामना पहिल्यांदा बरोबरीत सुटला, यानंतर भारताने ‘बॉल आऊटम’ध्ये विजय मिळवला.
-
जोहान्सबर्ग येथे झालेल्या याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची दुसरी गाठ पडली, पुन्हा एकदा या रोमहर्षक सामन्यात भारताने पाच धावांनी विजय मिळवला.
-
२०१२ मध्ये कोलंबो येथे झालेला सामना एकतर्फी होता, ज्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तान संघ सातत्याने मागे पडत होता आणि विराट कोहलीने या मोठ्या सामन्यात आपली पहिली छाप पाडली.
-
२०१४ मध्येही परिस्थिती तशीच राहिली, जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत दिसली आणि कोहलीने दुसऱ्या टोकाकडून योगदान देऊन भारताला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
-
२०१६ मध्ये कोलकाता येथे झालेल्या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता कमी होती. कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने शानदार गोलंदाजी केली. पण त्यांना विराट कोहलीला बाद करण्यात अपयश आल्याने भारताने भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला.
-
२०२१ चा सामना भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. कारण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या विक्रमी सलामीच्या भागीदारीमुळे पाकिस्ताने प्रथमत भारताचा १० गडी राखून पराभव केला.
-
मेलबर्नमधील २०२२ चा विश्वचषकातील सामना आतापर्यंत या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट सामन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने भारताला सहा विकेट्सने विजय मिळवून देताना सर्वात मोठी खेळी साकारली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”