-
Virat Rohit Reविराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहली आणि रोहितने टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. tires From T20I
-
रोहित कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. कोहलीनंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली होती, ज्यात तो यशस्वी ठरला. रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला.
-
कोहलीने अनेक टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला तोडणे सोपे नाही. मात्र, आता दोघांनाही संस्मरणीय निरोप मिळाला आहे.
-
टीम इंडियाने १७ वर्षांनंतर टी-२९ विश्वचषक जिंकला आहे. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. मात्र आता रोहित शर्माने पुन्हा एकदा चाहत्यांचे स्वप्न साकार केले आहे.
-
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र येथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, यावेळी रोहितने चाहत्यांना निराश न करता संघाला चॅम्पियन बनवले.
-
विराट कोहलीच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ती शानदार राहिली आहे. त्याने १२५ सामन्यात ४१६ धावा केल्या आहेत.
-
या कालावधीत त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १२२ आहे. कोहली टीम इंडियासाठी विश्वासार्ह आहे.
-
रोहितने भारताकडून १५९ टी-२० सामने खेळले. या कालावधीत ४२३१ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने ५ शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत.
-
रोहितची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद १२१ धावा. त्याने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्याची फलंदाजीही कठीण परिस्थितीत भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे. ((Photo Source -BCCI X)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…