-
भारतानं शनिवारी इतिहास घडवत टी २० विश्वचषक पुन्हा एकदा आपल्या नावावर केला आहे.
-
२००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी हा विजय भारतीय संघानं खेचून आणला. (ICC)
-
या विजयामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे अशा फलंदाजांसोबतच बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचीही छाप उमटली. (indiancricketteam)
-
अंतिम सामन्याच्या ‘अंतिम’ पाच षटकांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना आणि पर्यायाने विश्वचषकही निसटला! (indiancricketteam)
-
रोहित शर्मासह भारताचे सर्वच खेळाडू या विजयानंतर भावुक झाले. या विजयासह रोहित शर्माने इतिहास रचला आहे. (ICC)
-
रोहित शर्माच्या विश्वचषकातील ऐतिहासिक कामगिरीमुळे रोहित शर्माला त्याच्या फॅन्सने ‘मुंबईचा राजा’ अशी उपाधी दिली आहे. २९ जूनला सामना संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी मरिन ड्राईव्हवर एकच जल्लोष केला. (t20worldcup)
-
रोहित शर्माने आत्तापर्यंत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६२ सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने ५० सामने जिंकले आहेत. यासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि कर्णधार म्हणून रोहितचा हा ५०वा विजय असून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. (t20worldcup)
-
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयाचा विक्रम ७८ टक्के राहिला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ४८ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (indiancricketteam)
-
रोहितने याआधीच उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी करून टी-२० विश्वचषकाच्या एका सीझनमध्ये भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम मोडला होता आणि यंदाच्या मोसमात भारतासाठी आता सर्वाधिक भावा करणारा खेळाडूही ठरला. (indiancricketteam)
-
या विश्वचषकात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ८ सामन्यांच्या ८ डावात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७० च्या स्ट्राईक रेटने एकूण २५७ धावा केल्या. (indiancricketteam)
-
रोहित शर्माने ३ अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९२ होती. या खेळीत त्याने २४ चौकार आणि १५ षटकारही मारले. रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता तर एकूण सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. (indiancricketteam)
-
दरम्यान, रोहितला विसरण्याची सवय आहे हे आता जगजाहीर आहे. (indiancricketteam)
-
अशा परिस्थितीत रोहितने विश्वचषकाची ट्रॉफी न विसरता भारतात आणावी यांची आठवण त्याला चाहते करून देत आहेत. (indiancricketteam)
-
चाहत्यांनी रोहितच्या फोटोंवर कमेंट करत म्हटले आहे, ” भावा हॉटेलच्या रूममध्ये ट्रॉफी विसरून येऊ नको.” (indiancricketteam)
-
दुसऱ्या चाहत्यानेही रोहितला हीच आठवण करून दिली आहे. (indiancricketteam)
-
दरम्यान, या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. (Instagram)
-
मात्र रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या उत्कृष्ट खेळाडूंनी टी२० फॉरमॅटला रामराम केल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. (indiancricketteam)
-
रोहित शर्मा आणि सर्वच भारतीय क्रिकेटपटूंवर सध्या कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. (रोहित शर्मा)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…