-
बनावट प्रोडक्ट्सचा सुळसुळाट ही लोकप्रिय ब्रँड खरेदी करताना ठरणारी सर्वात मोठी डोकेदुखी. असंच काहीसं शाओमीसोबत घडतंय.
-
मार्केटमध्ये फेक प्रोडक्ट्सची संख्या खूप वाढलीये त्यामुळे ग्राहकांनी शाओमीचे अॅक्सेसरीज किंवा गॅजेट खरेदी करताना खबरदारी बाळगावी अशाप्रकारचा अलर्ट कंपनीकडून जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात कंपनीकडून दिल्लीतील पोलिस ठाण्यात कंपनीचे बनावट प्रोडक्ट तयार केले जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
त्यामुळे जर तुम्हीही शाओमीचं एखादं गॅजेट खरेदी करायचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
-
शाओमीची पावर बँक खरेदी करताना सिक्युरिटी कोड तपासून पाहा. सिक्युरिटी कोड mi.com वर चेक करुन प्रोडक्ट खरे आहे की खोटे हे पडताळता येणं शक्य आहे.
फिटनेस प्रोडक्ट – शाओमीचे original फिटनेस प्रोडक्ट Mi Fit या अॅपद्वारेच कार्यरत असतात. तसंच दुसरे स्मार्ट डिव्हाइस देखील कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या कंपेटिबल अॅपद्वारेच कार्यरत असतात. फेक डिव्हाइससोबत एकाही अॅपचा सपोर्ट मिळत नाही. तुम्हाला दुकानदारानं दिलेलं प्रोडक्ट बनावट असेल तर अॅपसोबत कनेक्ट करून पाहा. ते सुरू होणार नाही. बनावट फिटनेस बॅंडला कोणतंही अॅप सपोर्ट करत नाही. शाओमीचं कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना त्याचा बॉक्स व्यवस्थित तपासून पाहा. रिटेल बॉक्सची पॅकिंग आणि गुणवत्ता नीट चेक करा. कोणत्याही प्रोडक्टची पॅकिंग कंपनीच्या संकेतस्थळावरुन चेक करता येईल . -
शाओमीच्या ओरिजनल बॅटरीवर Li-Poly हे चिन्ह दिसेल, तर फेक प्रोडक्टवर Li-ion हे चिन्ह असेल.
फेक युएसबी केबल वायर आणि अॅक्सेसरीज दिसण्यास खराब आणि कमकुवत असतात. बनावट युएसबी त्यांची गुणवत्ता आणि त्याच्या रंगावरूनही ओळखता येऊ शकते. काही प्रमाणत ते जुनाट आणि खराब झालेले असतात. ओरिजन प्रोडक्ट हे दिसायला फ्रेश असतात. कोणत्याही ब्रॅंन्डच्या नकली वस्तू बाजारात उतरवताना त्या कंपनीचा बनावट लोगो तयार केला जातो. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे शाओमीने ग्राहकांना लोगो तपासून घेण्याचं आवाहन केलं आहे. फेक प्रोडक्टवरील लोगो खऱ्या प्रोडक्टपेक्षा थोडाफार तरी वेगळा असतोच. कंपनीच्या संकेतस्थळावरुन खरा लोगो चेक करता येईल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”