-
देशातील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी असणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्राचा आणि त्यांच्या गाड्यांचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी वेगवेगळ्या स्तरातील गाड्या बाजारात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo: Twitter/Mahindra_Auto)
-
नुकत्याच पार पडलेल्या २०२० मोटर शोमध्येही याचीच झकल पहायला मिळाली. कंपनीने क्वाड्रीसायकल प्रकारातील अॅटोम ही गाडी सादर केली. (Photo: Twitter/Mahindra_Auto)
-
या गाडीची टेस्टींगही सुरु झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच ही गाडी रस्त्यावर चाचण्यांदरम्यान दिसली होती. या गाडीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. (Photo: Twitter/MotorBeam)
-
महिंद्राच्या या मिनी कारमध्ये कंपनी १५ किलोवॅटच्या इलेक्ट्रीक मोटरचा वापर करणार असल्याचे समजते. ही गाडी कंपनीने पहिल्यांदा २०१८ मध्ये मोटर शोमध्ये सादर केली होती. (Photo: Twitter/MahindraElctrc)
-
अॅटोममध्ये स्वॅपेबल म्हणजेच बदलता येणारा बॅटरी पॅक आहे. प्रत्यक्षात ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हाही अशाप्रकारचा पर्याय कंपनीकडून देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Photo: Twitter/MahindraElctrc)
-
अॅटोममधील १५ किलोवॅटची बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास लागतील आणि त्यापैकी १२ किलोवॅट ऊर्जा वापरता येईल. (Photo: Twitter/MahindraElctrc)
-
टू डोअर कॉन्फिगरेशनच्या अॅटोममध्ये एकावेळेस चार जण बसू शकतात. (Photo: Twitter/MahindraElctrc)
-
अॅटोमचा सर्वाधिक वेग ६० किमी प्रती तासापेक्षा अधिक नसेल. इलेक्ट्रीक गाड्यांचा सर्वाधिक वेग हा गाडीचा सर्वाधिक वेग सामान्यपणे ६० ते ७० किमी प्रती तास इतका असतो. (Photo: Twitter/karlkolah)
-
डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास अॅटोम ही आकाराने अगदी छोटी गाडी आहे. या गाडीचे डिझाइन बॉक्स डिझाइन प्रकारचे आहे. (Photo: Twitter/karlkolah)
-
गाडीच्या मागील बाजूस ट्रिपल पॉड टेल लॅम्प आणि बंपरवर रिफ्लेक्टर स्ट्रीप देण्यात आल्या आहेत. (Photo: Twitter/karlkolah)
-
अॅटोमच्या चाकांच्या आकारासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Photo: Twitter/karlkolah)
-
अॅटोम ही क्वाड्रीसायकल गाडी भारतीय बाजारपेठेमध्ये बजाज क्युटीला टक्कर देणार आहे.
-
सध्या देशामध्ये बजाज क्युटी ही एकमेव क्वाड्रीसायकल व्हेइकल आहे.
-
बजाज क्युटीमध्ये पेट्रोल इंजिन आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या गाडीचे इलेक्ट्रीक व्हर्जन कंपनीकडून बाजारात उतरवले जाणार आहे की नाही यासंदर्भात बजाज कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
-
एकीकडे क्युटी ही इंधनावर चालणारी गाडी असली तरी तिला टक्कर देणारी महिंद्राची पहिली क्वाड्रीसायकल गाडी ही पूर्णपणे इलेक्ट्रीक कार असणार आहे.
-
महिंद्रा कंपनी सध्या अॅटोममध्ये अधिक मोकळी जागा आणि आरामदायक सुविधा देण्यावर काम करत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात सामान सामावून घेण्यासाठी जागा कशी उपलब्ध करुन देता येईल याबद्दल कंपनी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही गाडी पुढील वर्षीच बाजारात उतरवली जाणार आहे. (Photo: Twitter/itsmeSSP)
-
अॅटोममध्ये या गाडीमध्ये स्टॅण्डर्ड फिचर्स म्हणजेच सीट बेल्ट, एसी यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. मात्र ही इलेक्ट्रीक कार असल्याने त्यामध्ये एअर बॅग्स देण्यात येणार नाहीत.
-
अॅटोमबरोबरच कंपनी पुढील वर्षी ईकेयूव्ही १०० आणि इतर दोन इलेक्ट्रीक कार बाजारात उतरवणार आहे. ही फोटोत दिसणारी युडीओ ही दोन जणांसाठीची खास कारही महिंद्रा बाजारात उतरवणार आहे. ही गाडी २०१८ च्या मोटर शोमध्ये कंपनीने सादर केली होती. (AP Photo/Altaf Qadri)
-
इलेक्ट्रीक कार्सच्या क्षेत्रामध्ये महिंद्रा कंपनी एन्ट्री करणार असली तरी अॅटोम ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असावी असे कंपनीचे उद्दीष्ट आहे.
-
अॅटोम ही सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी मिनी कार असणार आहे. खास करुन शहरी भागांमध्ये जिथे पार्कींग आणि प्रदुषणाची समस्या आहे तेथील ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा विचार आहे. (Photo: Twitter/MahindraRise)
-
लो कॉस्ट आणि सर्व सामान्यांना परवडेल असाच किंमतीला गाडी उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यामुळेच अॅटोमची किंमत सामान्यांना परवडेल इतकीच असणार आहे. (Photo: Twitter/MahindraRise)
-
एका अंदाजानुसार अॅटोमची किंमत ही तीन ते पाच लाखांच्या दरम्यान निश्चित करण्यात येईल.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल